News & View

ताज्या घडामोडी

Category: परळी

  • पंकजा मुंडे,विखे पाटलांच्या कारखान्याला सरकारी मदतीतून वगळले !

    पंकजा मुंडे,विखे पाटलांच्या कारखान्याला सरकारी मदतीतून वगळले !

    बीड- राज्यातील काही ठराविक भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन मंजूर करण्यात आले आहे. मात्र राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजीमंत्री पंकजा मुंडे यांचे कारखाने यातून वगळण्यात आले आहेत, त्यामुळे भाजप अंतर्गत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात सहकारी तत्वावरील साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक कर्जाचे…

  • पंकजा मुंडे घेणार अमित शहांची भेट ! नाराजी बोलून दाखवणार !!

    पंकजा मुंडे घेणार अमित शहांची भेट ! नाराजी बोलून दाखवणार !!

    परळी- 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनेकांचा पराभव झाला मात्र गेल्या चार वर्षात त्यातील दोन डझन लोकांना आमदार आणि खासदार बनवण्यात आले मात्र आपल्याला सातत्याने का दूर ठेवण्यात आले नेमका आपलं कुठे चुकतंय हे आपण एकदा थेट अमित शहा यांना जाऊन विचारणार आणि त्यानंतर मीडिया आणि जनतेसमोर येऊन आपली स्वतःची भूमिका ठोसपणे मांडणार असं म्हणत भाजप…

  • वैद्यनाथ कारखाना बिनविरोध !बहीण भावाची दिलजमाई !!

    वैद्यनाथ कारखाना बिनविरोध !बहीण भावाची दिलजमाई !!

    परळी- स्व गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.माजीमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण भावाची दिलजमाई झाल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. स्वतः पंकजा मुंडे,यशश्री मुंडे,वाल्मिकी कराड आणि अजय मुंडे हे नूतन संचालक असतील. परळी सह मराठवाड्यात नावाजलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची संचालक पदासाठी निवडणूक जाहीर झाली…

  • पोलीस निरीक्षकाला अटक !

    पोलीस निरीक्षकाला अटक !

    परळी- पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी परळी येथील पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांना सीआयडी ने अटक केली आहे.अंबाजोगाई न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.या घटनेने खळबळ उडाली आहे. 2014 साली परळी पोलीस ठाण्याच्या कोठडीत चोरीच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.या प्रकरणात पोलिसांच्या मारहाणीत सदर…

  • सिलेंडर स्फोटात एक ठार चार जखमी !

    सिलेंडर स्फोटात एक ठार चार जखमी !

    परळी- शहरातील बरकत नगर येथे एका घरात सिलेंडर चा स्फोट होऊन एकजण ठार तर चार जण जखमी झाले आहेत.घराला अचानक लागलेल्या आगीमुळे हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अदिल उस्मान शेख (वय १४) असं स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. तर शमशाद बी सय्यद हाकीम, शेख आवेस गौस व अन्य दोन…

  • वैद्यनाथ कारखान्याची निवडणूक जाहीर ! 12 जूनला निकाल !!

    वैद्यनाथ कारखान्याची निवडणूक जाहीर ! 12 जूनला निकाल !!

    परळी- भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून 10 मे पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. 11 जून रोजी मतदान होईल तर 12 जूनला कारखान्यावर कोणाची सत्ता येणार याचा निकाल हाती येईल या कारखान्यावर भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे वर्चस्व…

  • जवाहर चे उद्या मतदान मात्र निकाल लागणार नाही !

    जवाहर चे उद्या मतदान मात्र निकाल लागणार नाही !

    परळी- माजी मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या जवाहर एज्युकेशन सोसायटीचे मतदान शनिवारी सहा मे रोजी होणार आहे या निवडणुकीकडे जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे जवाहर वर ताबा कोणाचा मिळणार हे मात्र अनिश्चित काळासाठी कळणार नाहीये कारण या मतदानाची मतमोजणी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केली जाणार असल्याने ती कधी…

  • वीस टक्यासाठी शिक्षण विभागाने मांडला बाजार !कुलकर्णी, शिंदे,शेळके,सोनवणे,काकडे,खटावकर यांची दुकानदारी तेजीत !!

    वीस टक्यासाठी शिक्षण विभागाने मांडला बाजार !कुलकर्णी, शिंदे,शेळके,सोनवणे,काकडे,खटावकर यांची दुकानदारी तेजीत !!

    बीड- राज्यातील ज्या विनाअनुदानित शाळांना वीस टक्के अनुदान मंजूर झाले आहे,त्यांचे प्रस्ताव तपासणीसाठी बीडच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात सध्या जोरात दुकानदारी सुरू आहे.कुलकर्णी,शिंदे,सोनवणे,शेळके,राऊत,हजारे,काकडे,खटावकर या सगळ्यांनी किमान पन्नास आणि कमाल दोन लाखाचा रेट काढल्याने संस्थाचालक बेजार झाले आहेत. बीड जिल्ह्यातील ज्या खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना  वीस टक्के अनुदानाचा लाभ मिळणार आहे अशा किंवा ज्यांना…

  • दिग्गज नेते ठाण मांडून ! बाजार समितीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष !!

    दिग्गज नेते ठाण मांडून ! बाजार समितीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष !!

    बीड- शेतकरी,व्यापारी आणि हमाल यांच्याशी निगडित असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला यंदा मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळीत माजीमंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे बहीण भाऊ,तर बीडमध्ये आ संदिप क्षीरसागर आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर हे काका पुतण्या मतदान केंद्रावर ठाण मांडून बसल्याचे चित्र पहावयास मिळाले. ही निवडणूक आगामी विधानसभेची रंगीत तालीम…