Category: महाराष्ट्र
-
खून करणाऱ्यांना माझा पाठिंबा नाही -धनंजय मुंडे!
नागपूर -मसाजोग प्रकरणात विरोधकांकडून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केले जातं असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी या विषयावर पत्रकारांशी संवाद साधला. वाल्मिक कराड हे माझ्या जवळचे आहेत हे मी मान्य करतो पण प्रकरणाबाबत स्वतः मुख्यमंत्री निवेदन करणार आहेत, तोपर्यंत थांबा असं म्हणत मुंडे यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली. मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येंनंतर…
-
मस्साजोग प्रकरणी आ संदीप क्षीरसागर आक्रमक!
नागपूर – मस्साजोग येथील दिवंगत सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरनातील नराधम आरोपी अजूनही मोकाटच आहेत. अतिशय विदारक प्रकरण असताना यातील आरोपी अटक होत नाहीत. प्रशासनाकडून या प्रकरणात दिरंगाई कशाबद्दल होत आहे? असा सवाल उपस्थित करत मस्साजोग प्रकरणी, नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आ.संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक होत विधिमंडळ परिसरात आंदोलन केले. केज तालुक्यातील मस्साजोग…
-
मुंडे बहीण भावासह 35 मंत्र्यांचा शपथविधी!
नागपूर -राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी सायंकाळी नागपूर येथे होतं आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही बहीण भावासह तब्बल 35 मंत्री शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धनंजय मुंडे,हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्ता मामा भरणे, संग्राम जगताप,सुलभा खोडके, इंद्रनील नाईक, शिवसेनेकडून आमशा पाडवी, गुलाबराव पाटील,भरत गोगावले,…
-
जिल्ह्यात जमावबंदी आदेशा लागू!
बीड-मराठा, ओबीसी,धनगर समाजाचे आरक्षण मागणी अनुषगांने आंदोलने चालू आहेत दि. 16 डिसेंबर 2024 पासून हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे.तसेच आगामी कालावधीत दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे. महाराष्ट राज्याचे हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने त्यांच्या न्याय मागण्यासाठी विविध प्रकारचे निदर्शने आंदोलने होण्याची शक्यता असून अचानक घडणारे घटनावरुन व किरकोळ कारणावरुन तणाव निर्माण…
-
पहिल्याच भाषणात रोहित पाटलांनी सभागृह जिंकले!
मुंबई -अमृताहूनी गोड नाम तुझे देवा असं म्हणत आपलं नाव देवा आहे त्यामुळे विरोधी पक्षाला सुद्धा गोड वागणूक द्याल अशी अपेक्षा करतो असा उल्लेख करणाऱ्या आ रोहित पाटील यांनी पहिल्याच भाषणात सभागृहाचे मन जिंकले. तासगाव कवठे महाकाळ मतदार संघातून विजयी झालेल्या रोहित पाटील यांनी आपल्या भाषणाने स्व आर आर आबांची आठवण करून दिली. राज्य विधानसभेचे…
-
डिसिएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन -एकनाथ शिंदे!
मुंबई -मी अडीच वर्षांपूर्वी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पदभार घेतला. मी सीएम म्हणजे कॉमन मॅन होतो आता डिसिएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन झालो आहे असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्याचे 21 वेळ मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावर शपथ घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी…
-
देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे, पवारांचा शपथविधी!
मुंबई -देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातील 18 मुख्यमंत्री, मुकेश अंबानी, शाहरुख खान यांच्यासह संत महंत आणि हजारो लाडक्या बहिणींच्या साक्षीने राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे 21 वे मुख्यमंत्री बनले…
-
महायुतीचा सत्तास्थापनेचा दावा!
मुंबई -महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे. महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावर दाखल झाले. त्यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र दिले. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने…
-
तो पुन्हा आलाय!देवेंद्र फडणवीस यांची गटनेते पदी एकमताने निवड!!
भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदि एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय निरीक्षक विजय रूपाणी आणि निर्मला सीतारमन यांच्या उपस्थितीत ही निवड झाली. त्यामुळे तो पुन्हा आलाय मुख्यमंत्री होण्यासाठी अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीने मोठं यश मिळवलं. तब्बल 233 जगावर विजय मिळवला. मात्र मुख्यमंत्री कोण…
-
शिंदे यांचा मोठा निर्णय!
मुंबई -गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेची भरपूर सेवा केली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाडका भाऊ झालो. ही पदवी मोठी आहे असं म्हणत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला आहे. त्यामुळे भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली….