Category: महाराष्ट्र
-
एकनाथ शिंदे यांचा राजीनामा!
मुंबई -राज्यचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सोबत घेत राज्यपाल यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. नवे सरकार स्थापन होईपर्यंत शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे…
-
शाळांना तीन दिवस सुट्टी!
मुंबई -विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना सोमवार ते बुधवार अशी सलग तीन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शाळेतील शिक्षकांना निवडणुकीत ड्युटी लागली आहे त्या शाळा थेट गुरुवारी उघडणार आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आजपासून 85 वर्षांपुढील वृद्धांच्या मतदानाला आणि पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं असून त्यांनाही मतदान दिवशीची…
-
परळीसह जिल्ह्यात गुंडगिरी वाढली!पक्ष फोडणाऱ्यांना हद्दपार करा -शरद पवारांचा धनंजय मुंडेवर हल्लाबोल!
परळी -बीड जिल्ह्यात विशेषतः परळी मध्ये गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. व्यापारी हैराण झाले आहेत. दहशतिखाली वावरत आहेत. ज्यांना संकट काळात साथ दिली त्यांनी पक्ष फोडण्यासाठी पुढाकार घेतला असं म्हणत अशा लोकांना सत्तेतून हद्दपार करा अन राजेसाहेब देशमुख यांना विजयी करा असे आवाहन खा शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद…
-
परळीतून राजाभाऊ फड यांची माघार तर बीडमध्ये अनिल जगताप लढणार!
बीड – विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून राजाभाऊ फड यांनी माघार घेतली आहे तर दुसरीकडे बीड मतदार संघातून अपक्ष म्हणून अनिल जगताप लढणार आहेत, माजीमंत्री सुरेश नवले यांनी देखील माघार घेतली आहे. बीडमध्ये अनिल जगताप, ज्योती मेटे आणि कुंडलिक खांडे यांनी आपले अर्ज कायमच ठेवले आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात मोठमोठ्या उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक…
-
जयदत्त क्षीरसागर यांची माघार!
बीड -माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा निवडणुकीत अपक्ष भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अचानक त्यांनी हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जातं आहे. बीड विधानसभा निवडणुकीत तीन क्षीरसागर एकमेकांसमोर उभे राहिल्याने काय होणार याकडे सर्वांचे लक्ष होते.दोन पुतणे अन एक काका यांच्यात मताचे विभाजन होणार हे नक्की होते. दरम्यान उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी…
-
जरांगे पाटलांची माघार!
अंतरवली सरटी -विधानसभा निवडणुकीत मराठा, मुस्लिम, दलित असं कोंबिनेशन तयार करून सर्वाना धक्का देण्याची तयारी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी अचानक यु टर्न घेत निवडणुकीतून माघार घेण्याचे जाहीर केले आहे. जरांगे पाटील हे 3 नोव्हेंबर रोजी कुठं उमेदवार उभे करायचे अन कुठं पाडायचे हे जाहीर करणार होते. त्यानुसार त्यांनी रविवारी बीड, केज, फुलंब्री, नांदगाव यशह…
-
बीड, केज, फुलंब्री सह 25 जागा लढणार -जरांगे!
अंतरवली सराटी -मराठवाड्यातील 25मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला आहे. बीड, केज, फुलंब्री यासह 25ठिकाणी उमेदवार उभे करण्याची घोषणा केली, ज्या जागेचे नाव जाहीर होणार नाही तिथं उमेदवार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे पत्रकार परिषदेत रात्री उशिरा ही घोषणा केली. बीड,…
-
मराठा,मुस्लिम, दलितांचे कॉम्बीनेशन!
जरांगे पाटलांचा डाव! अंतरवली सराटी – महाराष्ट्राच्या राजकारणात गुरुवारी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा, मुस्लिम आणि दलितांचे कॉम्बीनेशन होणार आणि सत्ता परिवर्तन निश्चित घडणार अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली. मुस्लिम समाजाचे प्रमुख मोलाना नोमानी आणि आनंदराज आंबेडकर यांनी अंतरवली सरटी येथे जाऊन पाटील यांच्यासोबत…
-
आष्टीत महायुतीत दोघांकडे एबी फॉर्म!
आष्टी -विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघात भाजपने सुरेश धस यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी एबी फॉर्म सह अर्ज दाखल केला. त्यामुळे येथील अजित पवार गटाचे विद्यमान आ बाळासाहेब आजबे यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा होती. मात्र आजबे यांनी शेवटच्या दिवशी पक्षाच्या एबी फॉर्म सहित अर्ज भरल्याने अधिकृत उमेदवार कोण, महायुतीत या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत…
-
प्रचंड रस्सीखेच अन महायुतीकडून डॉ योगेश फायनल!
बीड – महायुतीमध्ये बीड जिल्ह्यात एकमेव असलेल्या बीड मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत कोण उमेदवार असणार यावर अखेर पडदा पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे डॉ योगेश क्षीरसागर यांची उमेदवारी फायनल झाली आहे. रात्री दोन वाजता क्षीरसागर यांना एबी फॉर्म देण्यात आला. बीड जिल्ह्यात सहापैकी एकमेव बीड मतदार संघ शिवसेनेकडे होता. त्यामुळे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी…