Category: क्राईम
-
जिल्हा बँकेत लाचखोराला अटक !
बीड-लेखा परीक्षणाच्या धनादेशाची मंजुरी घेण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या शाखा व्यवस्थापकाच्या नातेवाईकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.ही कारवाई बीडच्या जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेत घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रथमेश उर्फ बाळू ठोंबरे असे लाच घेणाऱ्या आरोपीचे नाव आहे.त्याचे काका हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत व्यवस्थापक आहेत.माजलगाव तालुक्यातील खेर्डा येथील सेवा…
-
तीक्ष्ण हत्याराने वार करत वृद्धाचा खून !
धारूर- मुलाचे लग्न अवघ्या तीन दिवसांवर आले असताना तीक्ष्ण हत्याराने वार करत वृद्धाचा खून करण्यात आल्याची घटना धारूर तालुक्यात उघडकीस आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथील दत्तात्रय रामा गायके वय 58 यांच्या मुलाचे तीन दिवसांनी लग्न होते.घरात लग्नाची गडबड,पाहुणे आलेले असताना बुधवारी पाहटे दत्तात्रय गायके यांच्यावर…
-
आष्टीमध्ये बालविवाह ! विजय गोल्हार यांच्याविरुद्ध गुन्हा !!
आष्टी- एकीकडे राज्य सरकार,पोलीस हे सगळे बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती करत असताना भाजपच्या माजी जी प अध्यक्षांच्या पतीने बालविवाह लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.या प्रकरणी पोलिसात तब्बल तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आष्टी तालुक्यातील वेताळवाडीमध्ये हा बालविवाह लावण्यात आला. याप्रकरणी आता भाजप नेता विजय गोल्हार यांच्यासह नवरी व नवरदेवाचे आई- वडिल, फोटोग्राफर, आचारी, भटजी यांच्यासह…
-
डॉ हजारी यांच्या मुलाचे अपहरण ! चार तासात आरोपी जेरबंद !!
बीड- बीड शहरातील एसपी ऑफिससमोर राहणाऱ्या डॉ विशाल हजारी यांच्या मुलाचे अपहरण करून वीस लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.जुन्या ओळखीतून जय विशाल हजारी याचे अपहरण करण्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. मनीष प्रकाश क्षीरसागर आणि शैलेश संतोष गिरी या दोघांनी मंगळवारी सायंकाळी जय विशाल हजारी याला घराबाहेर बोलावून घेतले.तेथून गाडीवर…
-
ऑन ड्युटी अटॅक, पोलिसाचा मृत्यू !
बीड- कर्तव्यावर असताना पोलीस कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला अन त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. युवराज राऊत असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. पाटोदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले आणि मूळचे नाळवंडी येथील रहिवासी पोलीस कर्मचारी युवराज राऊत हे सकाळी पाटोदा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते.त्यावेळी त्यांना छातीत दुखू लागल्याने बीडला…
-
बीडमधील महिलेवर गँगरेप !
माजलगाव- रिक्षात विसरलेली पर्स परत करण्याच्या बहाण्याने एका महिलेवर मागील सात वर्षांपासून सुरू असलेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. बीड शहरातील कबाड गल्लीत हा भयंकर प्रकार सुरू होता.या महिलेचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत चार जणांनी तिचे शोषण केले. रिक्षात विसरलेली पर्स परत करण्याच्या बहाण्याने विधवा महिलेला रुमवर बोलावून एका…
-
उद्योगपती नरेश गोयल यांच्याविरुद्ध गुन्हा !
नवी दिल्ली- जेट एअरवेजचे संस्थापक तथा भारतातील बडे उद्योगपती नरेश गोयल यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.सीबीआय ने केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. कॅनरा बँकेच्या 538 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी जेट एअरवेज आणि त्याचे संस्थापक नरेश गोयल यांच्या मुंबईतील घर आणि कार्यालयासह सात ठिकाणी छापे टाकले. सीबीआयने शुक्रवारी नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता गोयल…
-
कुख्यात गुंड अनिल दुजाणा चे एन्काऊंटर !
मेरठ- मेरठ,गजियाबाद यासह अनेक शहरात धुमाकूळ घालणारा कुख्यात गुंड अनिल दुजाना उर्फ अनिल नागर याला एसटीएफने चकमकीत ठार केले आहे. यूपी एसटीएफने मेरठमध्ये ही कारवाई केली आहे. अनिल हा मोठा गुन्हा करण्याचा कट आखत असल्याची माहिती एसटीएफला मिळाली होती. त्यामुळे त्याचा शोध सुरू झाला. याच क्रमाने तो मेरठमध्ये लपल्याची माहिती मिळाली. यावेळी झालेल्या चकमकीत तो…