News & View

ताज्या घडामोडी

गुटखा तस्कर आबा मुळे वर मोक्का लावण्याची गरज !

बीड- परराज्यातून बीड जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा गुटखा तस्करी करणाऱ्या आणि तब्बल बारा ते तेरा गुन्हे दाखल असलेल्या महारुद्र मुळे उर्फ आबा मुळे वर मोक्का अंतर्गत कारवाई होणे आवश्यक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा आणि 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल असताना गुटखा तस्कर मुळे आबावर पोलीस एवढे का मेहरबान आहेत असा सवाल उपस्थित होत आहे.

बीड जिल्ह्यात गुटख्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर केली जाते.गेल्या अनेक वर्षांपासून महारुद्र मुळे उर्फ मुळे आबा हा या धंद्यात आहे.बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुटखा तस्करी आणि 307 सारखे गुन्हे दाखल आहेत.

काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी नगर येथील काही व्यापाऱ्यांना गुटखा प्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्याच्यावर 307 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी कुमावत यांच्या पथकाने त्याला अटक केली.

मुळे आबा वर किल्लेधारूर,दिंडरूड,सिरसाला, माजलगाव,औरंगाबाद वाळूज सातारा,नेकनूर येथे प्रत्येकी दोन गुन्हे गुटखा तस्करी चे दाखल आहेत तर बीड ग्रामीण आणि पेठ बीड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक एक गुन्हा दाखल आहे.

एखाद्या आरोपीवर दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असतील तर पोलीस मोक्का अंतर्गत कारवाई करतात मात्र मुळे आबावर बारा तेरा गुन्हे दाखल असताना अशी कारवाई का केली जात नाही अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *