Category: क्राईम
-

सुरेश कुटे फरार !ठेवीदारांकडून गुन्हा दाखल!
बीड- येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को ऑप सोसायटी मध्ये ठेवलेल्या नऊ लाख आणि 13 लाख रुपये वेळेत परतून देता फसवणूक केल्याप्रकरणी सुरेश कुटे,अर्चना कुटे यांच्यासह इतरांवर कलम 420 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. कुटे हे फरार असल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे. बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट को.ऑप.क्रे.सो.च्या गलथान कारभाराचा फटका संपूर्ण मराठवाड्याला बसला आहे. लाखो ठेवीदार अडचणीत आले…
-

सुरेश कुटेवर सहा ते सात प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश !
बीड- ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या ठेवीदारांचे पैसे न देता करोडो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अध्यक्ष सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळावर दोन वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत तसेच शुक्रवारी एकूण सहा ते आठ तक्रारीमध्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे एडवोकेट वीरेंद्र थिगळे आणि एडवोकेट अविनाश गंडले यांनी फिर्यादीचे वतीने…
-

सात कोटींची फसवणूक, चंदूलाल बियाणीसह इतरांवर गुन्हा दाखल !
बीड- राजस्थानी मल्टिस्टेट पतसंस्थेत ठेवीदारांनी ठेवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवींचा अपहार केल्याप्रकरणी अध्यक्ष चंदूलाल बियाणी यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे एकीकडे बियाणी यांच्यावर गुन्हा दाखल झाला असताना सुरेश कुटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास मात्र पोलीस टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. बिभीषण तिडके यांनी त्यांचे बारा लाख रुपये राजस्थानी मल्टिस्टेट मध्ये ठेवले होते.मात्र वारंवार मागणी…
-

सुरेश कुटे पोलीस प्रशासनाचे जावई आहेत का ? एसपी ठाकूर यांची भूमिका संशयास्पद !!
बीड- 90 हजार ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये आपल्याच कंपन्यांना कर्ज स्वरूपात घेऊन जवळपास तीन हजार कोटी रुपयांचा अपहार करणाऱ्या सुरेश कुठे यांना पोलीस संरक्षण कोणाच्या आदेशावरून दिले गेले अनेक पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज असताना गुन्हे का दाखल केले गेले नाहीत कुठे हे पोलीस प्रशासनाचे जावई आहेत का अशी चर्चा आता सुरू झाली असून पोलीस अधीक्षक…
-

लाचखोर खाडे पोलिसांना शरण !
बीड- तब्बल एक कोटी रुपयांची लाच मागून पाच लाख रुपये मध्यस्थांमार्फत स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेले अन फरार असलेले लाचखोर पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे हा स्वतःहून एसीबी समोर हजर झाला आहे.पोलिसांनी त्याला अटक केली आहे. माँ जिजाऊ पतसंस्था प्रकरणात सहकार्य करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांनी एक कोटी रुपयांची लाच मागितली होती….
-

खाडे च्या घरात कोट्यवधींचे घबाड !सोने ,चांदी जप्त !
बीड- तब्बल एक कोटी रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक हरिभाऊ राठोयाच्या घरी एक कोटी रुपये रोख रकमेसह साडेपाच किलो चांदी आणि जवळपास साडेआठ तोळे सोने सापडले.यातील पो कॉ जाधवर यांच्या घरी 25 तोळे सोने आणि रोख रक्कम आढळून आली. शहरातील माँ जिजाऊ पतसंस्थेचे कंत्राटदार यांना आरोपी न करण्यासाठी…
-

पाच लाखाची लाच स्वीकारली !पोलीस निरीक्षकासह तिघांवर गुन्हा !
बीड- शहरातील जिजाऊ मल्टिस्टेट प्रकरणात सहकार्य करण्यासाठी तब्बल 30 लाख रुपयांची लाच मागून पाच लाख रुपये स्वीकारताना बीडमध्ये एका खाजगी इसमास अटक करण्यात आले आहे. या प्रकरणात बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्यासह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. खाडे याच्या बीड येथील घराची झडती घेतली असतां कोट्यवधी रुपये सापडल्याची माहिती…
-

बीड पोलिसांच्या डोळ्यावर पैशाची पट्टी !
307 मधील आरोपी पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रचारात ! बीड-जिल्हा पोलीस दलाला पैसे खाण्याचा रोग लागला की राजकीय दबावाखाली काम करण्याची नवी पद्धत बीडच्या एसपींनी अंगवळणी पाडून घेतली आहे अशी शंका येऊ लागली आहे .शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले सत्ताधारी पक्षाचे कुंडलिक खांडे यांच्यावर 307 सारखा गंभीर गुन्हा असताना देखील ते उजळ माथ्याने लोकसभेच्या प्रचारात हिंडत आहेत आजी-माजी…
-

बीडच्या लाचखोर पोलीस निरीक्षकाला बेड्या !
बीड- शहरातील सम्राट चौक भागात राहणाऱ्या आणि धुळे येथे स्थानिक गुन्हे शाखेत नोकरीस असलेल्या पोलीस निरीक्षक दत्ता शिंदे यांच्यासह तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.शिंदे यांच्या घराची झडती घेतली असता करोडो रुपयांची मालमत्ता आढळून आली. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील 35 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, ते राजकीय व सामाजिक कार्यकर्ता आहेत. राजकीय सहकार्यांशी मतभेद झाल्याने त्यांच्याविरोधात…
-

शहर पोलिसांची मोठी कारवाई !
बीड- कपड्याच्या दुकानात जायचे,दोन चार ड्रेस चोरायचे असा प्रकार करत करत तब्बल चार लाख रुपयांचे कपडे चोरणाऱ्या चोरट्याला बीड शहर पोलिसांनी अटक केले.पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने या चोराच्या मुसक्या आवळल्या. जानेवारी महिन्यात सुभाष रोडवरील आर के मेन्स वेअर या कपड्याच्या दुकानातून चार लाख रुपये किमतीचे रेडीमेड कपडे चोरी गेल्याची माहिती मिळाली…


