मेष राशी
कामाचा ताण आणि घरातील उणीदुणी यामुळे त्रस्त व्हाल. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल.
वृषभ राशी
तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे कारण, तुमच्या द्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते.
मिथुन राशी
गरज नसलेल्या अशक्य गोष्टींवर विचार करण्यात तुमची शक्ती खर्च करू नका, त्यापेक्षा इतर योग्य कामासाठी तिचा वापर करा. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. कौटुंबिक व्यावसायिक प्रकल्प सुरु करण्यास शुभ दिवस.
कर्क राशी
तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील – कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या-वाईट बाबी तपासून पाहा.
सिंह राशी
बोलण्यापूर्वी दोनवेळा विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे अनवधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील. दिवसाची सुरवात जरी चांगली असली तरी, संद्याकाळच्या वेळी कुठल्या कारणास्तव तुमचे धन खर्च होऊ शकते ज्यामुळे तुम्ही चिंतीत व्हाल.
कन्या राशी
धर्मपरायण व्यक्तीचे शुभाशिर्वाद तुम्हाल मन:शांती मिळवून देतील. आई -वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल परंतु, नात्यामध्ये मजबुती येईल.
तुला राशी
तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल.
वृश्चिक राशी
थोडयाशा मानसिक ताणातदेखील आरोग्य चांगले राहील. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधनता बाळगा.
धनु राशी
चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. कुणाच्या मदतीविना तुम्ही धन कमावण्यात सक्षम राहू शकतात फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे.
मकर राशी
आणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल, पण त्याच वेळी भीतीपोटी, चिंतेमुळे निर्माण होणाºया द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा.
कुंभ राशी
ठराविक कालाने येणारा मानसिक शाररिक थकवा काही प्रश्न निर्माण करेल. तुमच्या शरीराची प्रक्रीया सुरळीत चालण्यासाठी संपूर्ण विश्रांतीची गरज आहे.
मीन राशी
आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल – तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा.
Leave a Reply