बीड -बीडमधील चंपावती प्राथमिक शाळेतील विद्यार्थी खरेदी विक्री प्रकरण असो कि कोळगाव येथील बोगस विद्यार्थी प्रकरण अथवा वैद्यनाथ विद्यालयातील बोगस शालार्थ आयडी आणि बोगस अप्रूव्हल चा विषय असो केवळ त्या त्या मुख्याध्यापक अथवा शिक्षक यांच्यावर कारवाई झाली. मात्र यातील मुख्य दोषी आणि जबाबदार असणारे संचालक आणि त्या त्या काळातील शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर मात्र कुठलीच कारवाई झालेली नाही. हे सगळे मोकाट कसकाय आहेत असा प्रश्न निर्माण होतं आहे. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी संचालक आणि अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे अशी मागणी होतं आहे.
शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या घटना बीडमध्ये उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. बीडमधील स्वातंत्र्य पूर्व काळातील स्थापना असलेल्या चंपावती शाळेत चक्क उत्तराखंड येथील विद्यार्थी आणून अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची पदे वाचवण्याचा प्रकार उघडकीस आला.
केवळ 3 नव्हे तरी 295 विद्यार्थी जास्तीचे दाखवून दहा शिक्षकांची पदे वाचवण्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी केवळ मुख्याध्यापक सारंग जोशी यांच्यावर नीलम्बनाची कारवाई झाली आणि गुन्हा दाखल झाला.
तसेच गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील शाळेत दहावीचे 19 विद्यार्थी बोगस आढळून आले, त्याचप्रमाणे परळीच्या वैद्यनाथ शाळेत चक्क पाच शिक्षकांची पदे बोगस अप्रूव्हल आणि बोगस शालार्थ आयडी काढून भरल्याचे समोर आले. त्यानंतर या शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश उपसंचालक यांनी दिले.
मात्र चंपावती असो कि वैद्यनाथ अथवा काजला या प्रकरणात दोषी केवळ मुख्याध्यापक नव्हते तरी संबंधित संस्थाचालक देखील दोषी आहेत. एवढेच नाही तर त्या त्या काळातील शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, पे युनिट चे अधीक्षक आणि कर्मचारी देखील दोषी आहेत. संचालक आणि अधिकाऱ्यांनी मिळून संगणमताने शासनाची फसवणूक केलेली आहे.
मात्र या सगळ्या प्रकारणामध्ये संचालक अथवा अधिकारी यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. उलट अधिकारी एकमेकांना आणि सोबत संचालक यांना देखील वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शिक्षण आयुक्त यांनी प्रत्येक शाळेत उघड होणाऱ्या घोटाळ्यात संचालक आणि अधिकाऱ्यावर सुद्धा गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होतं आहे.



Leave a Reply