News & View

ताज्या घडामोडी

आजचे राशिभविष्य !

मेष – आज तृतीय स्थानातील अमावस्या अनेक घडामोडी घडवेल. घरात तणावाचे वातावरण राहील. नकारात्मक विचारांना दूर ठेवा. जास्तीचे काम काढून घराची सजावट करण्याकडे कल राहील. पूजा, धार्मिक कार्य घडेल.प्रवास टाळा. दिवस मध्यम.

वृषभ – गुरू राहू व्यय स्थानातून भ्रमण करीत आहे. धार्मिक बाबींमध्ये, घरात खर्चिक अनुभव येतील. वक्री शनि नोकरीत काळजी घेण्याचे संकेत देत आहे. प्रवास योग येतील. साधारण फळ देणारा असा हा दिवस आहे.

मिथुन – आज राशीस्थानातून होणारी अमावस्या आर्थिक आणि कौटुंबिकदृष्ट्या क्लेश देईल. जबाबदाऱ्या पूर्ण कराल. रवि बुध नियम न मोडण्याचे संकेत देत आहेत. जोडीदाराला काही त्रास होऊ शकतो. काळजी घ्या. दिवस बरा.

कर्क

श्रीगणेश सांगतात की आज आपण खिन्नता आणि भय अनुभवाल. कुटुंबात मतभेद झाल्याने कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण असेल. मन द्विधा असेल त्यामुळे बेचैन असाल. बोलण्यावर ताबा ठेवा नाहीतर मतभेद होऊ शकतात. स्वास्थ्याकडे लक्ष द्या. आज खूपच खर्च होईल. मानहानी होऊ शकते म्हणून सावध राहा. तसेच गैरसमज दूर करा ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल.

सिंह – आज शुक्र मंगळ राशी स्थानात असेल. अचानक प्रवास योग. भावंड भेट होईल. स्वतः मध्ये सुधारणा करा. लाभ चंद्र आहे, आरोग्य जपा. नुकसान टाळायचा प्रयत्न करा. घरामध्ये वेळ द्या. दिवस मध्यम जाईल.

कन्या – अष्टम स्थानातून गुरूराहू भ्रमण कष्ट देणारे असून, घरामध्ये घडामोडी दर्शवित आहे. मित्र-मैत्रिणीसोबत दिवस व्यतीत करा. नकोसे विचार टाळा. घरात जास्तीचे खर्च होतील. मात्र, लाभ देखील होतील. दिवस मध्यम.

तुळ

श्रीगणेश म्हणतात की, आज नव्या कामाची सुरूवात करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. बौद्धिक काम व साहित्यलेखन यात गुंतून राहाल. तीर्थयात्रेला जाण्याची संधी मिळेल. परदेशात राहणार्‍या मित्र आणि सगे सोयरे यांच्या वार्ता समजल्याने तुम्ही प्रसन्न राहाल. सहकार्‍यांचे सहकार्य मिळणार नाही. संततीची चिंता लागून राहील. आज कोणत्याही चर्चेत किंवा वाद विवादात भाग न घेण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.

वृश्चिक – षष्ठस्थानातील ग्रह वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घेण्यास आणि घरासंबंधी काही निर्णय घेण्यास योग्य आहे. अष्टम चंद्र प्रकृती संबंधी तपासण्या, ताण देईल. दिवस मध्यम.

धनू

श्रीगणेशांच्या आशीर्वादाने तुमचा आजचा दिवस सुखशांती व आनंदात व्यतित होईल. मित्रांबरोबर चांगला दिवस. स्वादिष्ट भोजन, नवे कपडे प्राप्त होतील. विरुद्ध लिंगी व्यक्तींबरोबर आकर्षण वाढेल. त्यांच्याबरोबर रोमांचक भेट होईल. विचारात स्थिरता राहणार नाही. भागीदारीत फायदा होईल. सार्वजनिक जीवनात मानसन्मान मिळेल. वैवाहिक सुख उत्तम मिळेल.

मकर

आज आपले स्वास्थ्य चांगले राहील. यश, कीर्ती आणि आनंद प्राप्त होतील. कुटुंबीयांसमवेत आनंदात दिवस जाईल. व्यापारात प्रगती होण्यासाठी दिवस यश देणारा आहे असे श्रीगणेश सांगतात. धनलाभ होईल. प्रतिस्पर्ध्याला नामोहरम कराल. सहकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल. कायदेशीर बाबीत आज लक्ष न घातलेले बरे असे श्रीगणेश सांगतात.

कुंभ

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस हा आपला दिवस नाही. वैचारिक दृष्ट्या गर्क राहिल्याने कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय न घेणे हेच बरे. प्रवासात त्रास संभवतो. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने खूप निराशा होईल. मन अशांत राहील. पोटदुखी सतावेल. संततीची तब्येत किंवा अभ्यास यादबद्दल चिंता लागून राहील

मीन – आज चतुर्थ चंद्र घरामध्ये ताण निर्माण करेल. लाभ, जबाबदारीमध्ये सहभागी व्हा, असे संकेत देत आहे. सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या उत्तम दिवस. शैक्षणिक लाभ होतील. दिवस उत्तम.
शुभम भवतू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *