News & View

ताज्या घडामोडी

मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल !

छत्रपती संभाजी नगर- विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात खोटी माहिती देऊन फसवणूक केल्या प्रकरणी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे सत्तार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.या प्रकरणी ते दोषी ठरल्यास सहा वर्षासाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतील असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

मंत्री अब्दुल सत्तार यांनी यांनी 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत खोटी माहिती दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. एकच जमीन जी 2014 रोजी खरेदी केली, त्याच्या किमतीमध्ये 2019 ला अधिकची किंमत दाखवण्यात आली आहे. अशाच एकूण 4 ते 5 मालमत्तांसंदर्भात देण्यात आलेल्या माहितीत तफावत असल्याचं न्यायालयाच्या तपासात आढळून आलं आहे. त्यामुळे सिल्लोड न्यायालयानं या प्रकरणी खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. 

या प्रकरणी सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी 2021मध्ये याचिका दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तपास केला. तेव्हा ही माहिती समोर आली. 

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी 2014 आणि 2019 मध्ये निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात मालमत्तेसंबंधी माहितीत तफावत असल्याचं मान्य करत सिल्लोडच्या न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे आदेश बुधवारी दिले आहेत. हे आरोप सिद्ध झाल्यास अब्दुल सत्तार यांची आमदारकी जाईल. शिवाय 6 वर्ष निवडणूक लढण्यासही ते अपात्र ठरतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *