सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 अधिक ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी
🌸 नक्षत्र…. उ.षाढा
🌸 वार…. गुरुवार
🌼 दिनांक….. ०४ जून २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ०१/३० ते ०३/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/०३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य ‼️
‼️दिनांक ०४ जुन २०२६‼️
मेष:- कामांना गती मिळेल. आध्यात्मिक उपासना घडेल. आर्थिक लाभ होतील. इच्छापूर्ती होईल. मनासारखी कामे होतील. उत्साहामध्ये कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्यावी.
वृषभ:- मना सत्य संकल्प जीवी धरावा. सत्याच्या बाजूने राहा. आर्थिक लाभ होतील. शिक्षणांत प्रगती साधेल. नोकरी/व्यवसायात प्रगती होईल. धर्माचे काम कराल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
मिथुन:- मनाची चंचलता वाढेल. नकारात्मक विचारापासून दूर राहा. नात्यातून लाभ होतील. राजकारणात तुमचे वजन वाढेल. सकारात्मकतेने कार्य केल्यास लाभ होतील. कार्यपूर्तीचा आनंद मिळेल.
कर्क:- मित्र भागीदार यांचे सहकार्य लाभेल. नविन कार्य सुरु करण्यापूर्वी आधिचे काम पूर्ण करा. आर्थिक प्रगती चांगली होणार आहे. कौटुंबिक कार्यात सहभागी व्हाल. कामातील तणाव कमी होईल.
सिंह:- दिवसाची सुरुवात चांगली होईल. ओळखीतून कार्यात मदत होईल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. मात्र त्याचा परतावा मिळण्यास वेळ लागेल. स्वतःच्या मताचा आदर करा. दुसर्यांवर अवलंबून न राहता स्वतः कार्यतत्पर राहा.
कन्या:- अनुकूल ग्रहमान आहे. काय करावे व काय करू नये याची आपल्याला जाण आहे. योग्य सल्ला मिळाला तर स्विकारा. कामातील कौशल्यामुळे व्यवसायात तुम्हाला चांगले यश मिळेल. आज मनासारखी कामे होतील.
तुळ:- आध्यात्मिक उपासना घडेल. कौटुंबिक वातावरण आपणासाठी पोषक असेल. प्रगतीचा वेग चांगला राहील. स्पर्धेत तुम्हाला विजय प्राप्त होईल. न गोंधळता काम करा.
वृश्चिक:- बोलण्यातील स्पष्टता काही कामामध्ये विलंब करू शकते. सकारात्मकतेने कार्य संपादन करा. व्यवसाय वाढेल. आर्थिक आवक चांगली असणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंद उपभोगाल.
धनु:- आपल्या मधूर वाणीने लोकांना आकर्षित कराल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. स्थावर संपत्ती वाढेल. नविन कार्य सुरु करण्यासाठी उत्तम दिवस आहे. लक्ष्मीची कृपा राहील.
मकर:- उत्तम लाभ होतील. मित्र व कुटुंबियांकडून सहकार्य लाभेल. आपणाला सन्मान मिळेल. काही कामाबाबतीत निर्णय घेतांना मन चंचल होऊ देऊ नका. आज नवीन ओळखीतून फायदा होईल.
कुंभ:- उपासना घडेल. मनाला अस्थिरता वाटेल. प्रगती साधणारा दिवस आहे. सकारात्मक विचार करा, वडिलधार्या अनुभवी मंडळींचा सल्ला लाभदायक होईल. सांपत्तिक स्थिती सुधारेल. मात्र खर्च देखील वाढणार आहे.
मीन:- चांगला दिवस आहे. नविन मित्र होतील. नवीन संधी प्राप्त होतील. सामाजिक कार्यात भाग घ्याल. आवडते छंद जोपासले जातील. प्रवास घडतील.





Leave a Reply Cancel reply