News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 अधिक ज्येष्ठ शुक्ल द्वादशी / स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती
🌸 नक्षत्र…. चित्रा
🌸 वार…. गुरुवार
🌼 दिनांक….. २८ मे २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ०१/३० ते ०३/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/०३मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक २८ मे २०२६‼️

मेष:- नियोजित कामामध्ये यश लाभेल. दुसर्‍यांवर विश्वासून राहू नका स्वतः लक्षपूर्वक काम करा. आरोग्यविषयक काळजी घ्यावी. व्यापार वाढेल. मन आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील.

वृषभ:- चांगला दिवस आहे. नविन मित्र होतील त्यांचे कामामध्ये सहकार्य लाभेल. कौटुंबिक सुख लाभेल. नविन जबाबदारी वाढेल अचानक लाभ होतील.

मिथुन:- उधारी पासून दूर राहा. आनंदी दिवस आहे. कौटुंबिक वातावरण समजुतीने घ्यावे. कामात दिरंगाई जाणवेल. उपासना करा.

कर्क:- कलाकारांना उत्तम दिवस आहे. नविन कामामध्ये यश मिळेल. मनाप्रमाणे कार्य होईल. संवादाने कार्य होते तिथे वाद टाळावा. मात्र खर्च वाढतील. प्रवास कार्यसाधक होतील.

सिंह:- नियोजित कामामध्ये चांगले यश मिळेल. दुसर्‍यांवर अवलंबून न राहता स्वतः दक्षतेने कार्य संपादन करा. कलाकारांना चांगले यश मिळेल. प्रतिष्ठा सन्मान प्राप्त होईल.

कन्या:- विश्वासु लोकांकडून कार्यसिध्दिसाठी मदत होईल. मन आनंदी राहील. उत्साह व आत्मविश्वास वाढेल. मेजवानी मिळेल. अडचणी दूर होतील.

तुळ:- उत्सही राहण्यासाठी उपासना ध्यानधारणा करा. नवीन खरेदी होईल. चांगली बातमी समजेल. सकारात्मक विचार वाढवा. यश मिळेल.

वृश्चिक:- हितशत्रुंपासून सावध राहावे. नियोजन योग्य ठरेल. सुखद अनुभव येतील. गुंतवणूक लाभ देईल. जोडीदाराकडून लाभ होईल.

धनु:- सकारात्मक विचार करा. विचारपूर्वक निर्णय घ्या. मध्यस्ती टाळा. आर्थिक प्रश्न मार्गी लागेल. सहकाऱ्यांकडून लाभ होतील.

मकर:- नविन जबाबदारी वाढेल. हितशत्रुंपासून थोडा मानसिक त्रास संभवतो. मित्र सहकारी यांना पूर्ण माहिती उघड करू नका. व्यवसाय वाढेल.

कुंभ:- आत्मविश्वासपूर्वक कामामध्ये सुधारणा करा. सुखद घटना घडतील. मनाप्रमाणे कामामध्ये यश मिळेल. आनंदी राहा संयमाने काम करा. घरगुती कामासाठी वेळ द्यावा लागेल.

मीन:- चांगला दिवस आहे. कौटुंबिक जीवन चांगले आहे. भौतिक सुखे प्राप्त होतील. नविन कामांना गती येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version