News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 वैशाख कृष्ण नवमी
🌸 नक्षत्र…. शततारका
🌸 वार…. सोमवार
🌼 दिनांक….. ११ मे २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक ११ मे २०२६‼️

मेष
आज दशमात चन्द्र आहे.
आज कामात नवीन संधी मिळू शकतात. अचानक बदल स्वीकारावे लागतील. आत्मविश्वास ठेवा, पण रागावर नियंत्रण ठेवा.

वृषभ
आज भाग्यात चन्द्र आहे.
नशिबाची साथ मिळेल. प्रवास, शिक्षण किंवा आध्यात्मिक गोष्टींमध्ये रस वाढेल. आर्थिक बाबतीत सकारात्मक बातमी मिळू शकते.

मिथुन
आज अष्टमात चन्द्र आहे.
मनात अनेक विचार सुरू राहतील. आर्थिक व्यवहारात सावध राहा. गुप्त गोष्टी किंवा जुने विषय समोर येऊ शकतात.वाहन जपुन।चालवा.

कर्क
आज सप्तमात चन्द्र आहे.
नातेसंबंधात समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. जोडीदारासोबत संवाद स्पष्ट ठेवा. जोडीदाराकडून लाभ होऊ शकतो.

सिंह
आज षष्ठ स्थानी चन्द्र आहे.
कामाचा ताण वाढेल पण तुमची मेहनत लक्षात येईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात.

कन्या
आज पंचमात चन्द्र आहे.
सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढेल. प्रेमात यश.अकल्पित धनलाभाचे योग. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी अभ्यासात प्रगतीचा दिवस आहे.

तुळ
आज चतुर्थात चन्द्र आहे.
घरातील वातावरणात काही बदल होऊ शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवणे आवश्यक ठरेल. मानसिक शांततेसाठी विश्रांती घ्या.

वृश्चिक
आज तृतीया त चन्द्र आहे.
संवादातून लाभ मिळेल. नवीन ओळखी आणि संपर्क फायदेशीर ठरतील. छोट्या प्रवासाची शक्यता आहे.

धनु
आज धनस्थानी चन्द्र आहे.
आर्थिक बाबतीत चांगले निर्णय घेऊ शकाल. अचानक लाभाची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणेही आवश्यक आहे.

मकर
आज
चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. स्वतःसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ आहे. व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी दिसेल.अचानक फायदा होईल.

कुंभ
आज व्ययस्थानी चन्द्र आहे.अनपेक्षित खर्च होऊ शकतो.
मन थोडे अंतर्मुख राहू शकते. जुने विचार किंवा आठवणी त्रास देऊ शकतात. ध्यान आणि शांतता लाभदायक ठरेल.

मीन
आज लाभात चन्द्र आहे.
मित्र आणि सामाजिक संपर्कातून नवीन संधी मिळतील. एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.अचानकपणे लाभ घडेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version