News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 वैशाख शुक्ल दशमी
🌸 नक्षत्र…. मघा
🌸 वार…. रविवार
🌼 दिनांक….. २६ एप्रिल २०२६
🌚 राहुकाल…. सायं. ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक २६ एप्रिल २०२६‼️

मेष:-
आज
सकाळी पैशांबाबत किंवा घरातील एखाद्या गोष्टीबाबत चर्चा सुरू राहील. दुपारनंतर एखादा महत्त्वाचा फोन, मेसेज किंवा भेट होऊ शकते. तुमचे बोलणे प्रभावी राहील. नवीन ओळखींतून फायदा करून घ्यावा.

वृषभ :-
आज
सकाळपर्यंत तुमचा आत्मविश्वास खूप वाढलेला राहील. स्वतःसाठी काही नवीन ठरवाल. दुपारनंतर आर्थिक लाभाचे संकेत आहेत. खर्च आणि बचत यामध्ये योग्य समतोल ठेवा.

मिथुन :-
आज
सकाळी थोडी अस्वस्थता किंवा मनात संभ्रम राहू शकतो. दुपार नंतर चंद्र तुमच्या राशीत येत असल्याने ऊर्जा, उत्साह आणि आकर्षण वाढेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी उत्तम वेळ आहे.कामे मार्गी लागतील.

कर्क :-
आज सकाळच्या सत्रात
मित्र मैत्रिणी, सहकारी किंवा ओळखीच्या कडून मदत मिळेल. दुपारनंतर थोडा एकांत किंवा विश्रांतीची गरज वाटेल. मनातील भावना कोणाशी तरी बोलून व्यक्त केल्यास हलके वाटेल.

सिंह :-
आज
कामाच्या ठिकाणी तुमची छाप पडेल. वरिष्ठ किंवा घरातील मोठ्यांकडून कौतुक मिळू शकते. दुपारनंतर मित्रपरिवारातून किंवा सोशल नेटवर्कमधून एखादी चांगली बातमी मिळेल.मानसन्मान मिळेल.

कन्या :-
आज
भाग्याची साथ मिळेल. सकाळी प्रवास, शिक्षण किंवा धार्मिक गोष्टींकडे लक्ष जाईल. दुपारनंतर करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकते. स्वतःचे मत ठामपणे मांडावे.

तूळ :-
आज
आज काही गोष्टींबाबत मनात संभ्रम राहू शकतो, पण दुपारनंतर परिस्थिती स्पष्ट होईल. आर्थिक किंवा कुटुंबाशी संबंधित एखादा प्रश्न सुटू शकतो. दूरच्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल.

वृश्चिक :-
आज
नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवणे गरजेचे आहे. सकाळी जोडीदाराचे सहकार्य मिळेल. दुपारनंतर अचानक आर्थिक लाभ किंवा एखादे गुपित समजण्याची शक्यता आहे. भावनिक निर्णय टाळा.

धनु :-
आज
सकाळी कामाचा ताण जास्त जाणवेल. दुपारनंतर जोडीदार, प्रिय व्यक्ती किंवा भागीदारीतून फायदा होईल. संवादातून गैरसमज दूर होतील. आरोग्याची काळजी घ्या.

मकर :-
आज
आजचा दिवस आनंददायी राहील. मुलांबाबत, प्रेमसंबंध किंवा सर्जनशील कामात चांगले यश मिळेल. दुपारनंतर कामात व्यस्तता वाढेल, पण त्यातून समाधानही मिळेल.

कुंभ :-
आज
घरातील वातावरण प्रसन्न राहील. कुटुंबासाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. दुपारनंतर मन हलके होईल. प्रेम, आवडत्या छंद आणि मित्रांसोबतचा वेळ आनंद देईल.

मीन :-
आज
आज तुमचे बोलणे आणि कल्पना इतरांना प्रभावित करतील. दुपारनंतर घर, आई किंवा कुटुंबाशी संबंधित विषय महत्त्वाचे ठरतील. भावनांवर नियंत्रण ठेवल्यास दिवस अधिक चांगला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version