News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 चैत्र कृष्ण षष्ठी
🌸 नक्षत्र…. मूळ
🌸 वार…. बुधवार
🌼 दिनांक….. ०८ एप्रिल २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/२० मि.
🌘 सुर्यास्त ०६/४० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक ०८ एप्रिल २०२६‼️

मेष
आज चन्द्र सप्तमात आहे.
आज नात्यांमध्ये थोडा तणाव जाणवू शकतो. जोडीदाराशी गैरसमज टाळा. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवल्यास दिवस चांगला जाईल. काम करणाऱ्या नवीन संधी मिळू शकतात.

वृषभ
आज चन्द्र षष्ठ स्थानी आहे.
घर आणि काम यामध्ये संतुलन साधावे लागेल. आरोग्याची काळजी घ्या. ऑफिसमध्ये तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल. आज स्वतःसाठी थोडा वेळ काढावा.

मिथुन
आज चन्द्र पंचमात आहे.
प्रेम आणि आनंदासाठी उत्तम दिवस. सर्जनशील कामात यश मिळेल. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. स्वतःची आवड जोपासा.

कर्क
आज चन्द्र चतुर्थ स्थानी आहे.
घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. आई किंवा घरातील लोकांसोबत मतभेद होऊ शकतात. शांतपणे संवाद साधा. घर सजावट किंवा बदल करण्याची इच्छा होईल.

सिंह
आज चन्द्र पराक्रम स्थानी आहे.
आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. बोलण्याच्या शैलीमुळे लोक प्रभावित होतील. छोट्या प्रवासाचा योग आहे.मित्र- मैत्रिणींसोबत वेळ छान जाईल.

कन्या
आज चन्द्र धनस्थानी आहे.
आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. अनावश्यक खर्च टाळा. काम करणाऱ्या महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवण्याची संधी आहे.

तुळ
आज चन्द्र तुमच्या च राशीत आहे.
आज तुम्ही आकर्षणाचा केंद्रबिंदू असाल. व्यक्तिमत्त्व खुलून दिसेल. पण भावनिक चढउतार होऊ शकतात. स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःला प्राधान्य द्या.खर्च वाढेल.

वृश्चिक
आज चन्द्र व्यय स्थानी आहे.
मनात अस्वस्थता आणि गोंधळ राहू शकतो. जुन्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करा. ध्यान आणि प्रार्थना केल्यास मानसिक शांती मिळेल.

धनु
आज चन्द्र लाभात आहे.
मित्र-मैत्रिणींचा उत्तम सहवास लाभेल. नवीन संपर्क भविष्यात उपयोगी पडतील. एखादे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने पाऊल टाकाल.

मकर
आज चन्द्र दशमात आहे.
करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. जबाबदाऱ्या वाढतील, पण तुम्ही सक्षमपणे निभवाल.

कुंभ
आज चन्द्र भाग्यात आहे.
नशीब साथ देईल. शिक्षण, प्रवास किंवा नवीन कौशल्य शिकण्याचा योग आहे. आत्मविश्वासाने पुढे जा.

मीन
आज चन्द्र अष्टमात आहे.
भावनिक आणि आर्थिक बाबतीत सावध रहा. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. स्वतःची काळजी घ्या आणि विश्रांती घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version