सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 माघ कृष्ण द्वादशी
🌸 नक्षत्र…. पु.षाढा
🌸 वार…. शनिवार
🌼 दिनांक….. १४ फेब्रुवारी २०२६
🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/१५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक १४ फेब्रुवारी २०२६‼️
मेष: सहकारी जोडीदाराची साथ मिळेल. कामामध्ये प्रगती साधेल व्यवसाय वाढ होईल. वर्चस्व सिध्द करण्यासाठी चांगला दिवस आहे.
वृषभ: नविन जबाबदारी वाढेल. कौशल्यपूर्ण कामामधून प्रतिष्ठा वाढेल. नवनवीन संधी चालून येतील. आर्थिक लाभ होतील.
मिथुन: चांगला दिवस आहे. शुभ घटना घडतील. प्रवास कार्यसाधक होतील. जोखमीच्या कामापासून दूर राहा. नित्य कामासाठी चांगला दिवस.
कर्क: अनावश्यक खर्च होउ शकतो. हितशत्रुंकडून काही नुकसान होऊ शकते. मनातील अनामिक भिती दूर करा सकारात्मकतेने कार्य साधा.
सिंह: चांगला दिवस आहे. आज व्यवसायात वाढ संभवते. मन प्रसन्न राहील. कामातील दिरंगाई टाळावी. भेटीगाठीतून संवादातून लाभ होईल.
कन्या: नित्यकामकाज प्रगती पथावर राहील. महत्वाचे निर्णय घेतांना विचारपूर्वक चिंतन करून निर्णय घ्यावा. आर्थिक लाभ होतील.
तूळ: मनाप्रमाणे काही घटना घडतील. प्रवासाचे नियोजन कराल. धार्मिक आध्यात्मिक कार्यामध्ये रुची वाढेल. कौटुंबिक कलहापासून दूर राहा.
वृश्चिक: नियोजित कामामध्ये यश लाभेल. अनावश्यक खर्च वाढेल. नवीन ओळखी होतील ओळखीतून कामामध्ये मदत होईल.
धनु: मनासारखी कामे होतील. उत्साह व आत्मविश्वासपूर्वक केलेल्या कामामधून लाभ होईल. कौटुंबिक मतभेद टाळावेत.
मकर: नियोजित कामे आज पूर्ण करा. महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सकारात्मक विचारातून काही कार्य वेळेत पूर्ण होतील.
कुंभ: आनंदी दिवस आहे. नियोजित कामामधील प्रगतीमुळे समाधान होईल. दूरचे प्रवास घडतील. ध्यान योग प्राणायामाने मन प्रसन्न राहील.
मीन: आज कामे मार्गी लागतील. कामातीव यशामुळे प्रतिष्ठा सन्मान वाढेल. आर्थिक कामे होतील. वडिलधार्यांचे आशिर्वाद मिळतील.












Leave a Reply