सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 माघ कृष्ण चतुर्थी/ संकष्टी चतुर्थी चंद्रोदय ०९/२८ मि.
🌸 नक्षत्र…. उ.फाल्गुनी
🌸 वार…. गुरुवार
🌼 दिनांक….. ०५ फेब्रुवारी २०२६
🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०७/१० मि.
🌘 सुर्यास्त ०६/०५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६‼️
मेष: संयमाने घ्या बोलण्यात स्पष्टता ठेवा. गैरसमजातून मतभेद होउ शकतात, अनावश्यक खर्च टाळावा. सावधपणे केलेल्या व्यवहारात यश मिळेल.
वृषभ: वरिंष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल. मित्र नातेवाईक यांचेकडून सहकार्य लाभेल. आर्थिक नियोजन करा. अनावश्यक खर्च टाळावा.
मिथुन: कामामध्ये मार्ग सापडेल बोलण्यामध्ये स्पष्टता ठेवा. हितचिंतकांच्या गोष्टीकडे लक्ष द्या. कौटुंबिक जीवन चांगले असेल. भेटीगाठु होतील.
कर्क: आत्मविश्वासपूर्वक उत्साहाने कामामध्ये लक्ष द्याल. प्रतिष्ठा वाढेल आपल्या शब्दाची किंमत समजून विचारपूर्वक बोला. निर्णय घेण्यास चांगला दिवस आहे.
सिंह: कामाचा ताण वाढेल. नविन जबाबदाऱ्या वाढतील. दुसर्यांवर विश्वासून राहू नका. व्यवहारात सावध असावे. बारावा चंद्र मनाची चंचलता वाढवेल.
कन्या: नियोजित कामामध्ये प्रयत्नपूर्वक यश मिळेल. अपेक्षित फळं मिळेल. सुसंवादाने कौटुंबिक जीवनात मधूर संबंध राहतील.
तुळ: आवडत्या कामाची संधी मिळाल्याने प्रसन्नता वाटेल. आर्थिक कामामध्ये प्रगती होईल. मित्र नातेवाईक यांचेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेल.
वृश्चिक: गुप्तशत्रूंपासून सावधानता राखावी. वाणीमध्ये मृदुता ठेवा. कामामध्ये विलंब अथवा मनाप्रमाणे न झाल्याने चिडचिड होवू शकते.
धनु: नियोजित कामामध्ये यश लाभेल. वाणीने चांगला प्रभाव पडेल. मित्र सहकारी यांचेकडून मदत मिळेल.
मकर: तज्ञ व्यक्तीचा सल्ला महत्वाचा ठरेल. नियोजित कामामध्ये प्रगती साधेल. संवाद महत्वाचा ठरेल. वाद विवाद टाळावेत.
कुंभ: सकारात्मक विचार वाढवा. उदासीनता मानसिक तणाव संभवतो. संयमाने कार्य करावे. आर्थिक कामे होतील. दुसर्यांवर अवलंबून राहू नये.
मीन: साधारण दिवस आहे. नवीन संधी मिळू शकतात प्रयत्नामध्ये सातत्य ठेवावे. वेळेचा योग्य उपयोग करून घ्या. कौटुंबिक जीवन चांगले असेल.












Leave a Reply