News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 माघ कृष्ण तृतीया / संत नरहरी सोनार पुण्यतिथी
🌸 नक्षत्र…. पूर्वा फाल्गुनी
🌸 वार…. बुधवार
🌼 दिनांक….. ०४ फेब्रुवारी २०२६
🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०७/१० मि.
🌘 सुर्यास्त ०६/०५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक ०४ फेब्रुवारी २०२६‼️

मेष
आज
आज सकारात्मक मार्गदर्शन मिळेल. वरिष्ठ महिला किंवा गुरूसमान व्यक्तीकडून मदत मिळू शकते. संध्याकाळनंतर घरगुती विषय महत्त्वाचे ठरतील.

वृषभ
आज
चंद्र–गुरू योगामुळे आत्मविश्वास वाढेल. आर्थिक निर्णय योग्य ठरतील. शुक्र–गुरू षडाष्टकामुळे नात्यांत अपेक्षा जास्त ठेवू नका.

मिथुन
आज
दिवसभर चंद्र तुमच्या राशीत असल्याने मन सक्रिय राहील. संवाद, लेखन, शिकवणी यशस्वी. रात्रीनंतर भावनांवर थोडा ताबा ठेवा.

कर्क
आज चन्द्र व्यय स्थानी आहे.दगदग ,धावपळ होईल.
रात्री ८:०१ नंतर चंद्र तुमच्या राशीत – भावनिक समाधान, सुरक्षिततेची भावना वाढेल. आजचा शेवटचा भाग खूप दिलासादायक.

सिंह
आज
कामात स्थैर्य येईल. चन्द्र शनी त्रिकोणामुळे मेहनतीचे फळ मिळेल. मात्र नात्यांत अहंकार टाळा.

कन्या
आज चंद्र
नेपच्यून त्रिकोणामुळे अंतःप्रेरणा मजबूत राहील. संशोधन, आरोग्य, सेवा क्षेत्रात लाभ. भावनिक निर्णय टाळा.

तुळ
आज
प्रेम व मैत्रीत गोडवा राहील, पण अपेक्षा कमी ठेवा. संवाद स्पष्ट ठेवल्यास गैरसमज टळतील.

वृश्चिक
आज
चन्द्र हर्षल लाभ योगामुळे अचानक संधी मिळू शकते. जुने बंधन तुटण्याचा दिवस. भावना नियंत्रणात ठेवा.

धनु
आज
चंद्र–गुरू योग तुमच्यासाठी शुभ. शिक्षण, मार्गदर्शन, आध्यात्मिक गोष्टीत प्रगती.

मकर
आज
शनी त्रिकोणामुळे संयम आणि शिस्त वाढेल. घर-कार्यालय समतोल साधता येईल.

कुंभ
आज
नवीन कल्पना सुचतील. अचानक बदल संभवतात, पण फायदेशीर ठरू शकतात. रात्रीनंतर मन शांत होईल.

मीन
आज
चंद्र–नेपच्यून त्रिकोणामुळे करुणा, प्रेम, सर्जनशीलता वाढेल. भावनिक समाधान देणारा दिवस.संतती कडून शुभ समाचार मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *