News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 माघ कृष्ण द्वितीया
🌸 नक्षत्र…. मघा
🌸 वार…. मंगळवार
🌼 दिनांक….. ०३ फेब्रुवारी २०२६
🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०७/१० मि.
🌘 सुर्यास्त ०६/०५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६‼️

मेष: नियोजित कामामध्ये यश लाभेल, चांगला उत्साह वर्धक दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. तुमचे अधिकार वाढतील.

वृषभ: आपल्याच राशीत चंद्र आहे. आपल्या वाणीने चांगले संबंध प्रस्थापित होतील. मन प्रसन्न राहील. प्रसन्नतेने काम केल्यामुळे चांगली गती मिळेल. नैतिक कामांना बळ मिळेल. बुद्धीचातुर्य दाखवाल.

मिथुन: अनावश्यक खर्च टाळा, कामामध्ये उदासिनता वाटेल सकारात्मकतेने कामामध्ये लक्ष द्या. धार्मिक अनुष्ठान घडेल. दानधर्माचे उत्तम फळ मिळेल. आध्यत्मिक उन्नती होईल.

कर्क: निर्णय क्षमता चांगली असेल. सरकारी कामे मार्गी लागतील. परिस्थिती पाहून योग्य ते बदल केल्यास उत्तम यश मिळवू शकाल.

सिंह: नविक संकल्पना आमलात आणण्यासाठी उत्तम. कार्यसाधक दिवस आहे. वरिष्ठ खुश राहतील. मनासारखे काम होईल. सन्मान मिळतील. प्रतिष्ठा वाढेल.

कन्या: भेटीगाठीतून कार्य साधेल, वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. वरिष्ठांच्या सल्ल्याचा उपयोग करा. अर्थलाभ होईल. तीर्थाटन घडेल.

तुळ: आनंददायक घटना घडतील. देवीची उपासना लाभदायक होईल. कौटुंबिक जीवनातील मानापमानाचे प्रसंग उद्भवतील. अनुकूल ग्रहमान आहे. तीर्थाटन घडेल. धर्म कार्य होईल.

वृश्चिक: वरिष्ठांचे योग्य मार्गदर्शन मिळेल, त्यातून लाभ होतील. सरकारी कामे होण्यास वेळ लागेल. येणी वसूल होतील.

धनु: मनाचा मोठेपणा दाखवा समोरच्या व्यक्तीचे विचार ऐकून निर्णय करा. प्रगतीचा वेग चांगला असणार आहे. आरोग्याबाबत सजग व्हाल. अधिकारात वाढ होईल.

मकर: प्रसन्नता वाढेल कामानिमित्त प्रवास घडेल. व्यवसायाचा विस्तार होईल. विनाकारण नको तेथे धाडस दाखवू नका.

कुंभ: तुमच्या शब्दाला मान मिळेल. स्थावर संपत्तीचे प्रश्न सुटतील. मध्यस्थी स्विकारणे हितावह असेल. ऐश्वर्य लाभेल.

मीन: कामामध्ये प्रगती साधेल. मनातून सकारात्मकता प्रगती होईल. योग्य उपदेश मिळेल. काही प्रलोभने टाळावी लागतील. आर्थिक योग चांगला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *