News & View

ताज्या घडामोडी

IMG 20260116 WA0026 1

मुंबई भाजपचीच!राज्यात 22 महापालिका ताब्यात!

मुंबई –मुंबई महापालिकेवर भाजप शिवसेना महायुतीचा झेंडा फडकला आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेली 114 ही मॅजिक फिगर महायुतीने पार केली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या या निवडणुकीत अखेर ठाकरे बंधुची सत्ता उलथवून टाकण्यात भाजपला यश आले आहे. भाजपने राज्यातील 29 पैकी जवळपास 22 महापालिका ताब्यात घेतल्या आहेत. विशेष म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड मधून भाजपने अजित पवार यांना हद्दपार केले आहे.

बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप पहिल्यांदाच मोठा पक्ष म्हणून नावारुपाला आली. आता महापौर कोण होणार याची चर्चा रंगली आहे. तर भाजप मराठी महापौर करणार की हिंदी भाषिक महापौर बसवणार यावरूनही राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपचा मुंबईत झंझावात

देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेवर भाजपचा झंझावात दिसून आला. बीएमसीच्या 227 जागांपैकी भाजपला 118 जागांवर विजय जवळ केला आहे. तर सध्या 90 जागा खिश्यात घातल्या आहेत. तर दुसरीकडे शिंदे सेना 28 जागांवर आघाडीवर आहे. यानिकालातून भाजपने मोठा विजय मिळवल्याचे अधोरेखीत होत आहे. बहुमताच्या आकडेवारीमुळे भाजपचा पहिल्यांदाच मुंबईत महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेच्या इतिहासात आतापर्यंत भाजपचा कोणताही नेता महापौर होऊ शकला नाही. गेल्यावेळी ती संधी चालून आली असतानाही भाजपने नाराजी असतानाही एकीकृत शिवसेनेच्या महापौराला पाठिंबा दिला होता. महापौर निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला मोठ्या मनाने पाठिंबा दिला होता. आता भाजपने सत्ता मिळवल्याने भाजपचा महापौर कोण होणार याची चर्चा होत आहे.

सध्याच्या आकडेवारीनुसार भाजप 84, शिंदे गट 26, ठाकरे गट 63, मनसे 6, शरद पवार गट 1, काँग्रेस 23 जागांवर आघाडीवर आहेत. मुंबई महानगरपालिकेत बहुमतासाठी 114 जागांची गरज आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *