News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण प्रतिपदा
🌸 नक्षत्र…. पुर्नवसु
🌸 वार…. रविवार
🌼 दिनांक….. ०३ जानेवारी २०२६
🌚 राहुकाल… सायं ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य ‼️
‼️ दिनांक ०४ जानेवारी २०२६‼️

मेष
आज व्यय स्थानी चंद्र आहे,आज मन थोडं अस्वस्थ राहू शकतं. घरगुती जबाबदाऱ्या आणि स्वतःच्या इच्छा यामध्ये द्वंद्व निर्माण होऊ शकतं. कोणताही निर्णय घाईने घेऊ नका. अध्यात्मिक वाचन, ध्यान यामुळे मनाला शांतता मिळेल.

वृषभ
आज
मैत्री, सामाजिक वर्तुळ यामधून काही अपेक्षा पूर्ण न झाल्याने निराशा येऊ शकते. पैशाच्या बाबतीत आज सावध राहा. महिलांनी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा, यश हळूहळू पण नक्की मिळेल.

मिथुन
आज
कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. पतीकडून तसेच वरिष्ठांकडून अपेक्षा जास्त असतील, त्यामुळे तणाव जाणवू शकतो. पण तुमची बुध्दीचातुर्य आणि संवादकौशल्य तुम्हाला सावरण्यात मदत करेल.

कर्क
आज
आज धार्मिक, आध्यात्मिक विचारांकडे ओढ वाढेल. प्रवास किंवा शिक्षणाशी संबंधित विषयात अडथळे येऊ शकतात. संयम ठेवल्यास मार्ग नक्की सापडेल. आई किंवा ज्येष्ठ व्यक्तीशी संवाद मनाला आधार देईल.

सिंह
आज
आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. अचानक खर्च होऊ शकतो. अतिविश्वास टाळा. स्वतःच्या अंतःकरणाचा आवाज ऐका, पण निर्णय घेताना व्यवहारिकता ठेवा.

कन्या
आज
नातेसंबंधात गैरसमज होण्याची शक्यता आहे. जोडीदार किंवा जवळच्या व्यक्तीशी संवाद करताना शब्द जपून वापरा. आज संयम आणि समजूतदारपणा फार महत्त्वाचा आहे.

तुळ
आज
आरोग्याची थोडी काळजी घ्या. कामाचा ताण आणि मानसिक थकवा जाणवू शकतो. वेळेवर विश्रांती घ्या. सेवाभावी काम किंवा कुणाला मदत केल्याने मनाला समाधान मिळेल.

वृश्चिक
आज
आज भावनिक चढ-उतार जाणवतील. प्रेमसंबंधात अपेक्षा वाढू शकतात. मुलांशी किंवा सर्जनशील कामात वेळ दिल्यास सकारात्मक ऊर्जा मिळेल.

धनु
आज
घरात मतभेद होऊ शकतात. चंद्र-गुरू केंद्रयोगामुळे तुमच्या विचारांवर इतरांचा प्रभाव पडू शकतो. स्वतःचा आत्मसन्मान जपून निर्णय घ्यावा.

मकर

आज संवादातून गैरसमज होण्याची शक्यता आहे. आज कोणतीही गोष्ट स्पष्टपणे बोला. लेखन, वाचन किंवा शिकण्याशी संबंधित कामासाठी दिवस चांगला आहे.

कुंभ
आज
आर्थिक बाबतीत अपेक्षेपेक्षा खर्च वाढू शकतो. आत्ममूल्यांकन करण्याची गरज आहे. स्वतःच्या क्षमतांवर शंका घेऊ नका. थोडा संयम ठेवल्यास परिस्थिती सुधारेल.

मीन
आज
चंद्र तुमच्या च राशीत असल्याने भावना तीव्र असतील. गुरूशी केंद्रयोगामुळे मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. स्वतःला थोडा वेळ द्या, आत्मचिंतन करा. आज स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *