News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 पुष्य शुक़्ल षष्ठी
🌸 नक्षत्र…. शततारका
🌸 वार…. शुक्रवार
🌼 दिनांक….. २६ डिसेंबर २०२५
🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य ‼️
‼️ दिनांक २६ डिसेंबर २०२५‼️

मेष:- चांगला दिवस आहे. कामामध्ये प्रगती साधेल. भागिदाराची साथ मिळेल. विक्री व्यवसायात यश मिळेल. मान सन्मान मिळतील. अध्यात्मिक लाभ होतील.

वृषभ:- ठरवलेले कार्य पूर्ततेसाठी प्रयत्न करा. अनपेक्षित लाभ होतील. मित्र नातेवाईकांची भेटं व संवाद महत्वाचा ठरेल. आत्मविश्वास वाढेल. प्रतिष्ठा वाढेल.

मिथुन:- विचारपूर्वक निर्णय घ्या. अनावश्यक खर्च टाळा. काही गोष्टी मनाविरुध्द झाल्या तरी सांभाळून पावले टाका. कौतुक होईल.

कर्क:- आर्थिक लाभ होतील. संकल्प महत्वाचा शुभ संकल्प करा. कामामध्ये यश प्राप्त कराल. पत्नीचा सल्ला मोलाचा ठरेल. कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या.

सिंह:- व्यस्त दिवस असेल. कामाचा ताण वाढेल. उत्साहपूर्ण कामामध्ये लक्ष केंद्रित करा यश मिळेल. सन्मान मिळतील.

कन्या:- दुसर्‍यांचे सहकार्य स्विकारा मार्ग सापडेल. प्रिय व्यक्ती सोबत वेळ व्यतीत कराल. कुणाला शब्द देवू नका. चांगल्या कामामुळे मान सन्मान होईल.

तुळ:- आत्मबळ वाढविण्याची अवश्यकता आहे. मन प्रसन्न ठेवा. कामाचा दिवस आहे. नातेवाईकांचे आगमन व्यस्तता वाढवेल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. उत्तम धनलाभ होईल.

वृश्चिक:- प्रवासाचा योग आहे. कौटुंबिक प्रश्न हाताळतांना भावनिकतेला महत्व द्यावे लागेल. अर्थ लाभ होईल. व्यावसायिक यश लाभेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. अडचणीतून मार्ग सापडेल.

धनु:- कौटुंबिक सौख्य लाभेल. जवळच्या व्यक्तीकडून आपला मान सन्मान होऊ शकतो. स्थावर संपत्ती वाढेल. परिस्थिती आटोक्यात येईल.

मकर:- मित्र भागिदाराशी झालेल्या व्यवहारातून लाभ होईल मेजवानी मिळेल. नात्यातून शुभ समाचार समजतील. कामामध्ये यश मिळेल.

कुंभ:- उपासना साधना लाभदायक होईल. मौनं सर्वार्थ साधनम् मौनाने कार्य साधेल. महत्वाचे करार आज नकोत. खर्च वाढले तरी त्यातून आनंद मिळेल.

मीन:- प्रवास घडतील. मनासारखा दिवस व्यतीत होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. आर्थिक लाभ होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *