News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक़्ल प्रतिपदा /बलीप्रतिपदा /दिपावलीपाडवा /गोवर्धन पुजन/अन्नकुट
🌸 नक्षत्र…. स्वाती
🌸 वार… बुधवार
🌼 दिनांक….. २२ आँक्टोंबर २०२५
🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/२२ मि.
🌘 सुर्यास्त ०५/५७ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशि मंथन‼️
दिनांक २२ आँक्टोंबर २०२५

मेष:- आज साहसी स्वभाव दर्शन होईल.शत्रूंवर मात कराल.कोर्टात यश मिळेल.आर्थिक स्थिती चांगली राहील.आरोग्य सांभाळा. शैक्षणिक यशात कमतरता असेल.

वृषभ:- आज पंचमात चन्द्र आहे.प्रेमात अडथळे येतील.मुलांची चिंता वाटेल.मैत्र मंडळी,कुटूंबियांशी मतभेद होऊ शकतात.

मिथुन:- आज काही सुखद अनुभव येतील. दिवाळी खरेदीवर खर्च होईल. तुमच्या आक्रमक स्वभावाला आवर घालावा लागेल.राजकीय क्षेत्रात उत्तम कामगिरी कराल.

कर्क:- आज अत्यंत छान दिवस,मिळालेल्या संधीचे सोने करा. वेळ दवडू नका. व्यवसायात प्रगती होईल.लेखन कार्याशी संबंधित महिलांना उत्तम यश.रखडलेली कामे मार्गी लागतील.

सिंह:- आज उत्तम लाभ होईल. नवीन वाहन खरेदीचे योग. सामजिक मानसन्मान मिळेल.आर्थिक स्थिती मजबुत होईल.

कन्या:- आज लक्ष्मीची कृपा राहील. जीवनसाथी सोबत आनंदी क्षण व्यतित करा.प्रकृती कडे लक्ष द्या.वाहन काळजीपूर्वक चालवा.

तुळ:- आज संमिश्र दिवस आहे. बुद्धिमत्ता वापरून यश मिळेल. पतीशी मतभेद होऊ शकतात. कमीतकमी बोला.

वृश्चिक:- आज तुमचा दबदबा वाढेल. सामाजिक समारंभात प्रिय व्यक्ती भेटल्याने प्रसन्न वाटेल.मानसिक स्थिती मजबुत असेल. व्यापारात लाभ होईल.शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतात.

धनु:- आज उत्पन्न वाढेल.लक्ष्मी कृपा राहील.करीयर मध्ये नवीन संधी चालून येतील.गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस.

मकर:- आज राजकीय क्षेत्रात ल्या व्यक्ती ना यश मिळेल. परदेशात जाऊ इच्छुकांना संधी येईल.प्रसिद्धी मिळेल.

कुंभ:- आज अष्टम स्थानी चंद्र आहे. वारसाहक्क ची कामे रेंनगळतील.भावंडाशी मतभेद होऊ शकतात.

मीन:- आज कामात प्रगती होईल. शत्रू पराभूत होतील. मात्र काही अडचणी उदभवतील.पतिपत्नी मध्ये अनबन होऊ शकते.भावना तीव्र पणे व्यक्त कराल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *