News & View

ताज्या घडामोडी

IMG 20250818 WA00311

पूर्णवादीच्या सभासदांना मिळणार सात टक्के लाभांश!

पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेची 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 17/08/2025 रोजी वृंदावन गार्डन, बीड येथे डॉ सुभाष काशिनाथराव जोशी यांच्या अध्यक्षते खाली व ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. अरुणराव निरंतर यांचे मार्गदर्शनात संपन्न झाली. वार्षिक सर्वसाधारण सभेचा प्रारंभ दिप प्रज्वलन व प.पू.डॉ रामचंद्र महाराज पारनेरकर व प.पू. डॉ. विष्णु महाराज पारनेरकर तसेच भारत माता यांच्या प्रतिमा पुजनाने झाला.

बीड -महाराष्ट्रात आर्थिक क्षेत्रात नावाजलेल्या पूर्णवादी नागरी सहकारी बँकेने 1434 कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून यावर्षी सभासदांना सात टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यामध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.

सभेच्या नोटीसचे वाचन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेश कुलकर्णी यांनी केले तसेच या प्रसंगी त्यांनी बँकेचा सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा ताळेबंद व नफा तोटा पत्रकाचे सभेसमोर वाचन केले. यानंतर बँकेचे अध्यक्ष डॉ सुभाष जोशी यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा सभेसमोर मांडताना सांगितले की, बँकेने 4 दशकाचा कालखंड पार करीत 41 व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले असून 31 मार्च 2025 अखेर बँकेच्या एकुण ठेवी रू.897.13 कोटी एवढ्या तर कर्जे 537.44 कोटीची असून बँकेचा एकूण व्यवसाय हा रू. 1434 कोटी झालेला आहे. अहवाल वर्षात बँकेस 8 कोटी 75 लाख इतका निव्वळ नफा झाला असून या वर्षी सभासदांना 7% लाभांश घोषित केला आहे. नेट एनपीए चे प्रमाण 0.60% इतके आहे तर बँकेचा CRAR 13.87 % इतका आहे. बँकेचा पारदर्शक व्यवहार आणि ग्राहक व सभासदांनी बँकेवर दाखवलेला विश्वास यामुळेच बँकेची उत्तरोत्तर प्रगति होत असताना दिसून येते. तसेच त्यांनी आपल्या भाषणात बँकेच्या भविष्यातील वाटचालीबाबत माहिती देताना सांगितले की, बँकेने येत्या आर्थिक वर्षासाठी ठेवीचे उद्दीष्ट रू. 1200 कोटी व कर्जे रू. 800.00 ठेवले असून भविष्यात बँकेला शेड्यूल्ड दर्जा मिळवून देण्याचा निर्धार केला आहे आणि या उद्देशाने व्यवसाय वृद्धीसाठी मागील वर्षभरात बँकेच्या 11 शाखांमध्ये ग्राहक मेळावे आयोजित केले गेले. या मेळाव्यांमधून ग्राहकांनी व सभासदांनी तसेच नवीन हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून पूर्णवादी बँकेवरील स्नेह प्रकट केला. सर्व सभासदांना व ग्राहकांना संपर्क करण्यासाठी दिवाळी भेट कार्ड, तसेच पूजनीय विष्णूमहाराज पारनेरकरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलेली दिनदर्शिका, विविध कर्ज व ठेवी योजनांची माहिती देणारी पत्रके प्रकाशित करून बँकेची माहिती ग्राहक व सभासदापर्यन्त पोहोचविली. तसेच आजच्या या स्पर्धेच्या युगात ग्राहकांना कमी व्याजदरामध्ये कर्ज कसे उपलब्धा करून देता येईल या साठी बँकेने विविध कर्ज योजना सुरू केल्या आहेत. त्याचप्रमाणे मागील आर्थिक वर्षात जालना व अंबाजोगाई येथील बँकेच्या शाखा नवीन प्रशस्त व सोयीच्या जागेत स्थलांतरित केल्या असून कडा, आष्टी व परभाणी या शाखांच्या स्थलांतरासाठी सुद्धा रिझर्व बँकेची परवानगी मिळाली आहे. लवकरच या तीन ही शाखा नवीन जागेत स्थलांतरित होतील. तसेच ते म्हणाले की, अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्या पासून बँकेचे मार्गदर्शक मा निरंतर दादांनी मला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मार्गदर्शन केले आहे त्याच प्रमाणे मा श्री लक्ष्मीकांतजी पारनेरकर उर्फ कांतादादा हे उपाध्यक्ष म्हणून माझ्याबरोबर काम करत असून त्यांच्या रूपाने महाराजांचा कृपाशीर्वाद या बँकेवर सतत आहे.

यानंतर बॅंकचे सभासद श्री एन. के. कोटेचा , श्री प्रशांत जोशी , श्री राजुसेठ मुनोत, डॉ. हेमंत वैद्य व प्रा. किशोर काळे यांनी मनोगत व्यक्त करून बँकेच्या कारभाराविषयी समाधान व्यक्त केले. तसेच बँकेचे उपाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर यांनी मनोगत व्यक्त करतांना असे गौरवोदगार काढले की, बँकेची प्रगती मा. अध्यक्ष व सर्व संचालक यांचे अथक परिश्रमातून सुरू असून यामागे संचालकांच्या अंगी असलेला निस्वार्थी भाव हा महत्वाचा दुवा आहे. तसेच त्यांनी सध्याच्या स्थितीमध्ये सर्वांनी अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे सांगितले.
सभेचे औचित्य साधून बँकेच्या सभसादांच्या व कर्मचारी पाल्यांचा त्यांनी 2025 च्या शालांत परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल गौरविण्यात आले. यामध्ये बँकेचे सभासद श्री. किशोर सुभाषराव खडकीकर यांची मुलगी कु नारायणी हिचा तर कर्मचारी श्री विश्वंभर थिगळे यांचे चि. प्रसाद याचा समावेश होता. तसेच या प्रसंगी बँकेचे कर्मकारी व नित्य ठेव प्रतींनिधी यांच्या पाल्यांनी प्रोफेशनल पदवी प्राप्त केल्या बद्दल सन्मानित करण्यात आले त्यामध्ये न्यायाधीश परीक्षेत महाराष्ट्रातून सर्वप्रथम आल्याबद्दल कु. ऋचा विठ्ठल कुलकर्णी, डॉ. सर्वेश महेश पारगावकर, CA रोहित राजेश कुलकर्णी व CA चि कैवल्य हेमंत गोंदीकर यांचा समावेश होता.

सभेचे सुत्र संचलन बँकेचे संचालक श्री.जगदीश शिरापुरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन बँकेचे संचालक डॉ. विवेकजी पालवनकर यानी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *