News & View

ताज्या घडामोडी

रिपाईचा सरकारला ईशारा !

बीड- राज्यभर सरकारकडून सुरु असलेली गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटाव मोहीम तातडीने थांबवली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा रिपाईच्या वतीने देण्यात आला.पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला.

विविध मागण्यांसाठी रिपाईच्या वतीने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली.बोलताना ते म्हणाले की,1964 पासून कसत असलेल्या जमिनी नियमाकुल करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले राज्याचे समाज कल्याण मंत्री असताना दि. 1 एप्रिल 1978 ते 14 एप्रिल 1990 पर्यंत कसं असलेल्या गायरान जमिनी नावे करण्यासाठी शासन निर्णय लागू केला.

त्यामुळे लाखो हेक्टर जमिनी शासन निर्णय लागू झाल्यापासून गायरान धारक जमिनी नावे काढण्यासाठी पुराव्यासहित प्रस्ताव दाखल करून पाठपुरावा करीत आहेत. परंतु मंडळ अधिकारी, तलाठी यांनी गाव पातळीवरील राजकारणाच्या दबावापोटी गाव नमुना व ई-वर नोंदी घेतलेल्या नाहीत. अटी व शर्ती प्रमाणे गायरान जमिनी नियमाकुल करण्याचा आदेश असताना देखील गायरान धारकांची प्रस्ताव तहसील कार्यालय महसूल कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत. दलित बहुजन आदिवासी भूमिहीन गोर गरीब समाज बांधवांना जमिनीपासून व घरांपासून बेघर करण्याचा शासन निर्णय गोरगरिबांना उध्वस्त करणार आहे. गोरगरिबांना जमिनीपासून व घरापासून वेदकल होऊ देणार नाही. कसेल त्याची जमीन राहील त्याचे घर ही भूमिका शासनाला मान्यच करावी लागेल. नसता या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात रिपाइंच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *