News & View

ताज्या घडामोडी

IMG 20250806 WA0029

दादा, पालवण परिसरातील जळून गेलेल्या डेन्स फॉरेस्ट ला भेट द्या!

पाणी असूनही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जळाली हजारो झाडे!

बीड – एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी बीड जिल्ह्यात 30 लाख वृक्ष लागवड शुभारंभ केला जात असताना दुसरीकडे पालवन परिसरात तीन वर्षांपूर्वी कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेल्या डेन्स फॉरेस्ट ची अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वाट लागली आहे पाणी उपलब्ध असून देखील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हजारो झाडे जळून त्यांचे सरपन झाले आहे दादा जमल्यास पालवन परिसरात चक्कर मारा आणि तुमच्या अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार स्वतःच अनुभवा.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी सात ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यात अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यामध्ये हरित महाराष्ट्र या योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यात तब्बल एक कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

यातील तब्बल 30 लाख झाडे गुरुवारी एकाच दिवसात लावण्यात येणार आहेत. एकीकडे बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांनी या 30 लाख झाडांमध्ये सात लाख तुतीची झाडे लावण्याचे आदेश काढत थूक्याला थुका लावण्याच काम केला असताना अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा आणखी एक नमुना समोर आला आहे.

बीड शहरा नजीक असलेल्या पालवन शिवारात एका डोंगरावर वनविभागाच्या वतीने तीन वर्षांपूर्वी घनदाट वृक्ष लागवड अर्थात डेन्स फॉरेस्ट या योजनेअंतर्गत तब्बल 30 ते 40 हजार झाडे एक एकर मध्ये लावण्यात आली होती.

मात्र गेल्या तीन वर्षात बीड जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाल्याने तलावात पाणी असून देखील या डेन्स फॉरेस्ट ला आणि झाडांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पाणीच न दिल्यामुळे या झाडांचे अक्षरशः सरपंन झाले आहे.

1002350016

एकीकडे बीडच्या जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी वृक्ष लागवडीसाठी सात लाख कोटीच्या झाडांचे लागवड करण्याचे आदेश देत या मोहिमेचे भवितव्य काय असणार आहे हे स्पष्ट केले असताना दुसरीकडे जर अशा पद्धतीने हजारो झाडे पाण्याअभावी जळून जाणार असतील तर हा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अजित दादा कारवाई करणार का आणि फॉरेस्ट ला भेट देणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *