News & View

ताज्या घडामोडी

दादासाहेब मुंडेवर मोठी जबाबदारी!

बीड – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस पदी दादासाहेब मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

मागील 25 30 वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय असलेल्या तसेच गोपीनाथ मुंडे शोध की धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळच्या आणि विश्वासू म्हणून ओळखले जाणाऱ्या दादासाहेब मुंडे यांच्यावर प्रदेश काँग्रेसने जबाबदारी टाकली आहे.

गेल्या काही वर्षापासून दादासाहेब मुंडे हे काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय झाले होते . नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुंडे यांच्यावर प्रदेश काँग्रेसने राज्यातील अनेक मतदारसंघात प्रचाराची धुरा सोपवली होती.

काँग्रेस हाय कमांड च्या वतीने राज्यातील विविध पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली ज्यामध्ये दादासाहेब मुंडे यांच्यावर प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *