बीड (प्रतिनिधी)- शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दि.20 जुलै रविवार रोजी निर्धार नवपर्वाचा पदाधिकारी संवाद मेळाव्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या सुचनेवरून जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी नगरसेवक अमर नाईकवाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी निवड केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिले गेले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी निर्धार नवपर्वाचा पदाधिकारी संवाद मेळावा कार्यक्रमास ना. धनंजय मुंडे साहेब, महिला आयोग अध्यक्ष रुपाली ताई चाकणकर, युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण, मा. खा.आनंद परांजपे, सामाजिक न्याय प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे,ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष कल्याण काका आखाडे, बाळासाहेब आजबे, आ.विजयसिंह पंडित, आ. विक्रम काळे, संजय दौड, राजकिशोर (पापा) मोदी, जयसिंह सोळंके आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी मंत्री धनंजयजी मुंडे व मा.आ. अमरसिंहजी पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली अमर नाईकवाडे यांनी आपल्या प्रभागासह बीड शहरात केलेली रस्ते-पाणी-स्वच्छता आणि आरोग्य सुविधा, विविध शिबिरे तसेच उपक्रम व उल्लेखनिय कामगिरी, शहरभर असलेला उत्तम जनसंवाद, विविध सामाजिक कामे, रात्रंदिवस नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी असलेली तळमळ, त्यांची पक्ष वाढीसाठी असलेली कार्यक्षमता पाहून आज त्यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे.
दरम्यान पक्षाने अमर नाईकवाडे यांची शहराध्यक्ष म्हणून निवड केल्याने शहरातील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आले असून आगामी काळात बीड शहरात अधिक गतिमान विकास कामे होतील अशी आशा जनसामान्यातून व्यक्त होत आहे.
तसेच निवडीचा सत्कार स्वीकारुन अमर नाईकवाडे म्हणाले की ही निवड माझ्यासाठी एक जबाबदारी असून पक्षाचा माझ्यावरील विश्वास आणि जनता व कार्यकर्ते यांच्या प्रेमामुळे मला मिळालेली संधी आहे त्यामुळे मी पक्ष, जनता आणि कार्यकर्त्यांसाठी सदैव कटीबध्द राहील व पक्षाचे सर्वेसर्वा नामदार अजित दादा पवार यांचे विचार जनसामान्यांपर्यंत रुजवण्याचे काम प्रामाणिकपणे करेल असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष अमर नाईकवाडे यांनी म्हटले आहे.












Leave a Reply