सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वर्षा
🚩 दक्षिणायन 🌕 आषाढ शुक़्ल चतुर्दशी/पौर्णिमा प्रारंभ उ. रात्री ०९/३६ मि.
🌸 नक्षत्र… मुळ
🌸 वार… बुधवार
🌼 दिनांक….. ०९ जुलै २०२५
🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०५/४६ मि.
🌘 सुर्यास्त ०७/१० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशिमंथन‼️
‼️दिनांक ०९ जुलै २०२५‼️
मेष:- अष्टम स्थानी चंद्र आहे. चंद्राचा रवीशी अशुभ योग आहे. आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. मात्र तिसऱ्या रवीच्या मुळे काही सुखद घटना घडतील. शत्रू त्रास देतील. विनाकारण धाडस नको. प्रवासाचे बेत बदलतील. अडचणी वाढू शकतात.
वृषभ:- संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. जोडीदाराचा सल्ला मानावा लागेल. मन अवस्थ राहू शकते. अनामिक भय दाटून येईल. पत्नीच्या सुखाचा विचार कराल.
मिथुन:- अपेक्षा बहनग करणारा दिवस आहे. घरात विनाकारण कटकटीं होऊ शकतात. स्थावर संपत्तीचे वाद निर्माण होऊ शकतात. भाडेकरूशी विवाद संभवतात. धार्मिक उपासना केल्याने मन स्थिर राहील.
कर्क:- घरगुती काम पूर्ण होईल. शेअर्स मधून बरे लाभ मिळतील. अचानक धनलाभ संभवतो. कायद्याचे पालन करा. सरकारी कामात दिरंगाई होऊ शकते. प्रतिष्ठा सांभाळा.
सिंह:- राशीस्वामी अनुकूल असले तरी आज त्याचा विशेष लाभ मिळणार नाही. तुम्हाला प्रशंसा आवडते. मात्र आज त्याची कमतरता जाणवेल. राजकारणात यश नाही. मित्रांचा गैरसमज होऊ शकतो.
कन्या:- सुखद ग्रहमान आहे. दशम रवी तुम्हाला आनंद आणि समाधान देईन. व्यावसायिक प्रश्न सुटतील. व्यावसायिक यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. लहानसहान प्रश्नात उगाच जास्त लक्ष घालू नका.
तुळ:- सिद्धी प्राप्त करून देणारा दिवस आहे. यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. जप आणि अनुष्ठान यातून उत्तम अनुभव येतील. आज कर्जे घेणे टाळा.
वृश्चिक:- आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. भरभराट होईल. मात्र चिंता वाढवणाऱ्या घटना घडू शकतात. नात्यात वाद संभवतात. कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतात. राजकीय क्षेत्रात माघार घ्यावी लागेल.
धनु:- प्रतिकूल ग्रहमान आहे. काही अप्रिय अनुभव येतील. अडचणीतून मार्ग सापडेल. मात्रतो कितपत योग्य आहे याची खात्री करून घ्या. प्रवासाचे नियोजन बदलेल. खर्च वाढू शकतो. जोडीदाराला त्रास होऊ शकतो.
मकर:- लाभ स्थानी चंद्र अनुकूल आहे. बढतीचे योग आहेत. नोकरीत चांगल्या घटना घडतील. शत्रू पराभूत होतील. शेअर्स मध्ये दुपारी ११ ते २ या वेळेत जपून निर्णय घ्या.
कुंभ:- संमिश्र ग्रहमान आहे. सूर्याची अनुकूलता नाही. शेअर्स किंवा लॉटरीयातून नुकसान संभवते. दैवी उपासना करण्यासाठी चांगला कालावधी आहे. आनंदाची अनुभूती घ्याल. मात्र खर्च वाढेल.
मीन:- नवम स्थानी चंद्र आहे. संमिश्र दिवस आहे. अति धाडस नको. दानधर्म करा. चतुर्थ सूर्य तुम्हाला मानसिक समाधान मिळवून देईन. राजकीय किंवा सरकारी क्षेत्रातील व्यक्तीकडून त्रास संभवतो.












Leave a Reply