बीड -उमाकिरण क्लासेस अत्याचार प्रकरणी आरोपी असलेल्या विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
शहरातील उमाकिरण क्लासेस मधील एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीने मागील वर्षभरात तिच्यावर झालेल्या अत्याचार प्रकरणी पोलिसात धाव घेतली होती. या प्रकरणी प्रा विजय पवार आणि प्रा प्रशांत खाटोकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
29 जुन रोजी या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर सुरवातीला दोन दिवसांची आणि त्यानंतर चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
पाच जुलै रोजी या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली.





Leave a Reply Cancel reply