News & View

ताज्या घडामोडी

बीडच्या सीए बियाणी ला 22 लाखाचा दंड अन एक वर्षाची शिक्षा !

बीड – बीड येथील सीए गोविंद बियाणी यांना फसवणूक केल्याप्रकरणी 22 लाख रुपये दंड आणि एक वर्षाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.सरकी पेंड खरेदीच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी प्रकाश गोरकर यांनी दाखल केलेल्या खटल्यात न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

फिर्यादी प्रकाश दत्तोपत गोरकर यांनी चार्टर्ड अकाउंटट गोविंद रामविलास बियाणी यांचे सोबत 80 टन सरकी पेंड 14 हजार 100 रुपये प्रति टन प्रमाणे खरेदी करण्याचा तोंडी करार केला होता त्याप्रमाणे हा करार वरद ऑइल इंडस्ट्रीज जी की आरोपीचे पत्नीचे नावाने असून त्याचे माध्यमातून झाला होता प्रकाश गोरकर यांना आरोपीस दिनांक 27/3/2014 रोजी 11 लाख 40 हजार रुपये देऊन सरकी पेंड खरेदी करुन आरोपी गोविंद रामविलास बियाणी यांना दिले होते.

सदरची सरकी पेंड आरोपी गोविंद बियाणी परत वेळेत देऊ शकले नसल्यामुळे त्यावेळेच्या बाजारभावा प्रमाणे प्रकाश गोरकर यांना परत देण्याचे आरोपी गोविंद बियाणी यांनी मान्य केले होते, परंतु सरकी पेंड वेळेत देऊ शकले नसल्यामुळे त्या वेळचा बाजार भाव 18 हजार 750 रुपये नुसार 11 लाख 25 हजाराचा आरोपीने अॅक्सिस बँकेचा धनादेश श्री प्रकाश गोरकर यांना दिनांक 01/01/2015 रोजी दिला परंतु तो धनादेश न वटल्यामुळे प्रकाश गोरकर यांनी मा. न्यायालयात एस एस सी क्रमांक 296/2015 नुसार प्रकरण दाखल केले होते

या प्रकरणात आरोपी व फिर्यादी यांचे साक्षीदार पुरावे होऊन फिर्यादी प्रकाश गोरकर यांचे म्हणणे ग्राह्य धरून माननीय 4 थे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी अविनाश पाटील यांनी आरोपी गोविंद रामविलास बियाणी यांना एक वर्षाची तुरुंगवसाची शिक्षा व 22 लाख 50 हजार रुपये दोन महिन्याच्या आत देण्याचे आदेशीत केले असून फिर्यादी प्रकाश दत्तोपंत गोरकर यांच्या वतीने अॅड. अविनाश पंडित गंडले यांनी काम पाहिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *