News & View

ताज्या घडामोडी

नगर पालिकेला टाळे ! पगारासाठी कामगार आक्रमक !!

बीड- बीड नगर पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दुपारी थकीत पगारासाठी टाळे ठोकले .गेल्या अनेक महिन्यापासून नगर परिषदेच्या स्वच्छता करणाऱ्या कंत्राटदाराने कामगारांना वेतन दिलेले नाही,त्यामुळे संतप्त कामगारांनी नगर परिषदेच्या मेन गेट ला कुलूप ठोकले.त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

बीड शहरातील स्वच्छता करण्याचे कंत्राट नांदेड येथील कंत्रादाराला देण्यात आलेली आहे.मात्र शहरातील परिस्थिती पाहता स्वछता केवळ नावालाच होते की काय अशी स्थिती आहे. या कंत्राटदाराकडून स्वच्छता कामगारांना वेळेवर पगार दिला जात नसल्याने यापूर्वी अनेकवेळा आंदोलन करण्यात आले होते. विशेषतः एप्रिल महिन्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वेतन तातडीने देण्याचे आदेश दिले गेले.

मात्र त्यानंतर देखील कोणत्याही प्रकारे वेतन देण्यासाठी हालचाल झाली नाही.नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे या कार्यालयात हजर नसतात त्यामुळे संतप्त कामगारांनी गुरुवारी दुपारी मेनगेटला कुलूप ठोकले.कार्यालयीन वेळेत हा प्रकार झाल्याने खळबळ उडाली.

दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांनी अचानक पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. त्यामुळे पालिकेचे जवळपास ५० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यालयातच अडकले. शिवाय विविध कामांसाठी पालिकेत गेलेले सामान्य नागरिकही अडकून पडले होते. या प्रकारानंतर पाेलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली, परंतु आतील लोक बाहेर काढण्यात त्यांनाही यश आले नाही. महिलांनी जोपर्यंत वेतन होत नाही, तोपर्यंत कुलूप उघडणार नाही, असा पवित्रा घेतला होता.

बीड नगर परिषदेच्या कारभारात गेल्या वर्षभरापासून अवमेळ असल्याचे चित्र आहे.मुख्याधिकारी जागेवर सापडत नाहीत,त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणाचाच वचक राहिलेला नाही. मनमानी कारभाराला बीडकर वैतागले आहेत.अशातच स्वच्छता कामगारांचे वेतन होत नसल्याचे प्रकरण समोर आले.या कामगारांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *