News & View

ताज्या घडामोडी

IMG 20230518 WA0020

महाप्रबोधन यात्रेचा बीडमध्ये शनिवारी समारोप -अनिल जगताप !

बीड- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या महाप्रबोधन यात्रेचा समारोप बीडमध्ये येत्या 20 मे रोजी होत आहे.या सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी दिली.

बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत जगताप बोलत होते.पत्रकार परिषदेत संपर्क प्रमुख धोंडू पाटील,माजीमंत्री बदामराव पंडित,माजी आ सुनील धांडे,जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची उपस्थिती होती.

माने कॉम्प्लेक्स येथील पारस नगरीच्या मैदानावर ही सभा होणार आहे.या सभेस जिल्हाभरातून किमान दहा हजार शिवसैनिक हजर राहतील.महिलांसाठी विशेष बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या सभेच्या माध्यमातून आगामी काळात शिवसेना पक्षाची पुढील काळातील दिशा निश्चित केली जाणार आहे.या सभेस खा संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे या मार्गदर्शन करणार आहेत.

शिवसेना,भाजप यांच्यासोबत केवळ बाजार समितीच्या निवडणुकीत आपण युती केली,मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्ष जी भूमिका घेईल त्यानुसार काम केले जाईल अशी माहिती जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *