News & View

ताज्या घडामोडी

मोदींचा रिजिजू यांना धक्का ! कायदामंत्री पद काढले !!

नवी दिल्ली- देशाचे कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्याकडील खात्याचा कारभार अचानकपणे काढून घेण्यात आला आहे.आता अर्जुन मेघवाल नवे कायदामंत्री असतील.गेल्या काही महिन्यांपासून न्यायाधीश आणि रिजिजू यांच्यातील वादामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.किरेन रिजिजू यांच्याकडे पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे

मोदी सरकारने कायदा मंत्री किरन रिजिजू यांच्या खात्यात बदल केला आहे. रिजिजू यांच्या जागी आता अर्जुन राम मेघवाल कायदा मंत्री असतील. २०२१ मध्ये रिजिजू यांना कायदा मंत्री करण्यात आले होते. रिजिजू हे वर्तमान आणि निवृत्त न्यायमूर्तींबद्दलच्या टिप्पणीमुळे चर्चेत आहेत. देशात कोणीही कोणालाही इशारा देऊ शकत नाही, असेही त्यांनी कॉलेजियमबद्दल म्हटले होते. देशातील प्रत्येकजण संविधानानुसार काम करतो. निवृत्त न्यायाधीशांबाबतही त्यांनी वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, काही निवृत्त न्यायाधीश भारतविरोधी गटाचा भाग बनले आहेत.

रिजिजू यांच्याकडील खाते अचानकपणे बदलण्यात आल्याने केंद्र सरकार मध्ये सर्वकाही अलबेल नाही हेच स्पष्ट झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोलेजियम च्या मुद्यावरून केंद्र सरकारचे कायदामंत्री आणि न्यायपालिका यांच्यात अनेकवेळा वाद झाल्याचे पाहायला मिळाले,त्यामुळे मोदींनी हा बदल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *