मेष – एखाद्या नातेसंबंधाबाबत कदाचित अनिश्चितता वाटत असेल. आपल्या जोडीदारासोबत स्पष्टपणे चर्चा करा आणि आपल्या मनाचं ऐकून योग्य तो निर्णय घ्या. करिअरमध्ये एखादी नवीन संधी चालून येईल, आर्थिक लाभ संभवतो. प्रॅक्टिकल राहण्याचे आणि स्थैर्याचे हे संकेत आहेत.यासोबत येणाऱ्या बदलांनाही स्वीकारा. तब्येतीसाठी सेल्फ केअर आणि ब्रेक घेणं गरजेचं आहे. अति कामामुळे होणारं एक्झर्शन टाळणं गरजेचं आहे. स्वतःसाठी काही वेळ काढल्यास फायदा होईल.प्रवास केल्यामुळे मनातली गुंतागुंत कमी होऊन नवीन दृष्टिकोन मिळण्यास मदत होईल.
वृषभ – सध्या मेंदू काय सांगतोय यापेक्षा मन काय म्हणतंय याकडे लक्ष द्या. आपल्या जोडीदारासोबत जास्त दिवस झाले नसूनही तुम्हाला अगदी दृढ संबंध जाणवतील. तुमच्या नात्यामध्ये क्षमा आणि करुणा या गोष्टी महत्त्वाच्या असल्याची जाणीव होईल.करिअरमध्ये आर्थिक यश मिळेल. नवीन संधी चालून येतील. तसंच, पगारवाढ किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची आणि विचारपूर्वक गुंतवणूक करण्याची गरज आहे.आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्याला फलदायी अशा सवयींचा अवलंब करा. आगाऊ नियोजन तुम्हाला ऑर्गनाईज्ड राहण्यात मदत करील.
मिथुन -एखाद्या खास व्यक्तीकडून मिळालेले संकेत सोडून तुम्ही कॅज्युअल गोष्टींकडे अधिक लक्ष केंद्रित कराल.तुम्ही नुकतीच ओळख झालेल्या एखाद्या व्यक्तीशी घट्ट संबंध प्रस्थापित करणं विसरला असाल किंवा मग समोर असलेल्या दोन पर्यायांपैकी एकाची निवड करण्याची तुम्हाला गरज आहे. लवकरच आर्थिक यश मिळेल. पगारवाढ किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. नव्या संधी समोर येतील.सध्या शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट टाळा. तसंच कागदपत्रांवर विशेष लक्ष द्या. आत्मशांतीसाठी प्रवास फायद्याचा ठरेल. नवीन दृष्टिकोन मिळवण्यासाठी तुम्हाला कदाचित नवीन अनुभवाची गरज आहे.वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर आहारात बदल करण्याची गरज आहे.
कर्क -तुमच्या मनात केवळ प्रेमाशी संबंधित विचार सुरू असतील. जवळच्या व्यक्तीकडून तुमच्याकडे दुर्लक्ष होण्याचा अनुभव सध्या घेत असाल. तुमच्या नात्यांमध्ये क्षमा आणि करुणा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे ओरॅकल दर्शवतंय.तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ शकतो. कोणतीही गुंतवणूक करताना तुम्ही रँडमली निर्णय घेता. तसं न करता, विचारपूर्वक गुंतवणूक करणं गरजेचे आहे. प्रवासाचे बेत पुढे ढकलले जातील, संयम बाळगणं गरजेचं आहे.सध्या सेल्फ केअरला प्राधान्य द्या आणि तुम्हाला सपोर्टिव्ह असे नातेसंबंध प्रस्थापित करा. आपल्या मानसिक आरोग्यासाठी हीलिंग प्रॅक्टिसचा आधार घ्या.
सिंह -आजचा दिवस तुमच्या नात्यांमध्ये नवीन सुरुवात किंवा भावनिक समाधान घेऊन येईल. तुमच्या मूल्यांशी, विचारांशी विचार जुळणारी एखादी व्यक्ती तुम्हाला भेटू शकते.आपल्या असुरक्षिततांचा स्वीकार करा, आणि मनातल्या खऱ्या भावना व्यक्त करण्यावर भर द्या. सध्या आर्थिक स्थैर्य आणि करिअरमध्ये सुरक्षिततेचा काळ आहे. भूतकाळातल्या कामाचा चांगला परतावा आता तुम्हाला मिळेल. तुमच्या मेहनतीसाठी आणि योगदानासाठी बोनस किंवा कौतुक मिळेल.कुटुंबीय आणि सहकाऱ्यांची चांगली साथ लाभेल. दूरच्या प्रवासाचा तब्येतीला फायदा होईल. नवीन ठिकाणी गेल्यामुळे जुने पॅटर्न सोडून देण्यास मदत होईल, तसंच आयुष्यात पुढे जात असल्याची भावना निर्माण होईल.
कन्या – नातेसंबंधांमध्ये अडकलेल्या भावनांतून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही मदत शोधत असाल किंवा एखाद्या चमत्काराची वाट पाहत असाल.तुमच्या मनातल्या भावना स्पष्टपणे आणि मोकळेपणाने बोलून दाखवण्याचा सल्ला ओरॅकल देतं. इतर लोक बऱ्याच वेगाने पुढे जात आहेत आणि तुम्ही आहे तिथेच आहात असं वाटत असल्यामुळे मनात असुरक्षिततेची भावना असू शकते. भूतकाळात दिलेल्या कमिटमेंट्स विसरू नका, तसंच कोणत्याही प्रकारच्या रँडम कमेंट्स करणं टाळा. कामासाठी प्रवासाची संधी चालून येईल.
हा प्रवास तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. यामुळे व्यवहारज्ञानात भर पडेल.
तूळ -प्रेमाच्या बाबतीत स्वतःवर आणि आपल्या मनावर विश्वास ठेवण्यास शिकाल. प्रेम, रिलेशनशिप अशा गोष्टींमध्ये आपल्या मनाचं ऐकण्याचा सल्ला ओरॅकल देत आहे.करिअरमध्ये काही अडचणींना सामोरं जात आहात; मात्र धाडस आणि ताकदीने या अडचणींवर मात कराल. आपले प्रोफेशनल गोल्स पूर्ण करण्याच्या दृष्टीने अधिक प्रेरित व्हाल. इतरांपासून दुरावले गेल्याची भावना मनात घर करून बसेल, अशा वेळी मनःशांतीची गरज भासेल. प्रवास केल्यामुळे आयुष्याच्या एखाद्या नव्या टप्प्याची सुरुवात करण्याची संधी मिळेल.यामुळे आयुष्यात बदल घडवून आणून परिवर्तनाच्या दृष्टीने प्रयत्न कराल. नवीन अनुभव आणि दृष्टिकोन मिळेल.
वृश्चिक तुम्ही कदाचित नवीन प्रेमाचा अनुभव घेत आहात किंवा जुन्या नात्याला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहात. ओरॅकल सध्या पॅशन आणि आनंदाचे संकेत देत आहे.
म्हणजेच, तुम्ही आपल्या जोडीदारासोबत मजबूत आणि परिपूर्ण नातेसंबंध प्रस्थापित करू शकाल. करिअरमध्ये विपुलता आणि यश आकर्षित करण्याची क्षमता तुमच्यात आहे. तुमच्या हेतूंची शक्ती हे साध्य करण्यासाठी तुमची मदत करील. आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि आपल्या यशाची कल्पना मनात ठेवा.
मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी सेल्फ केअरवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आयुष्यात रिस्टोरेशन आणि रिज्युव्हिनेशनचे संकेत आहेत. स्वतःची काळडी घेऊन विश्रांती घेण्याची गरज आहे.
धनू- तुम्हाला तुमच्या नात्यांमध्ये हीलिंग आणि माफी या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे.यामुळे कोणतीही नकारात्मकता किंवा नाराजी सोडून, प्रियजनांसोबत मजबूत भावनिक बंध तयार होण्यास मदत मिळेल. निसर्गातल्या शक्तींवर विश्वास ठेवा आणि तुमच्या ध्येयाबाबत मनामध्ये स्पष्टता ठेवा. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संधी चालून येतील. आपल्या जीवनात आणखी थोडी मजा आणि खेळांचा समावेश केल्यास फायदा होईल.आनंद आणि लाइटनेस शोधण्याचा प्रयत्न करा, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
मकर – तुम्ही एखाद्या नवीन रोमँटिक नातेसंबंधांची सुरुवात कराल किंवा सध्या सुरू असलेल्या नात्याला अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न कराल. आपल्या जोडीदारासोबत प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे संवाद साधा. तसंच वेळ पडल्यास तडजोड करण्याची तयारी ठेवा.नातेसंबंधांमध्ये एक भक्कम पाया रचण्यासाठी एकत्रितपणे काम करा. लवकरच नवीन संधी चालून येतील किंवा करिअर बदलाची संधी मिळेल. आपल्या मनावर विश्वास ठेवा आणि नवीन मार्गांचा स्वीकार करण्याची तयारी ठेवा. दिनचर्येमध्ये एखाद्या फिजिकल अॅक्टिव्हिटीचा समावेश केल्यास फायदा होईल.
तुम्हाला आनंद देईल अशा फिजिकल अॅक्टिव्हिटीचा शोध घ्या आणि आपल्या शारीरिक आरोग्याला प्राधान्य द्या. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ व्यतीत केल्याने फायदा होईल. नवीन संस्कृतींचा अनुभव घ्या. प्रवासादरम्यान आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन घेणंही फायद्याचं ठरेल.
कुंभ- सध्या तुमच्या नात्यांमध्ये वृद्धीचा आणि बदलाचा काळ आहे. हा बदल स्वीकारा आणि परिवर्तनाच्या या प्रोसेसवर विश्वास ठेवा. यामुळे तुमचे संबंध अधिक दृढ होतील. तसंच भविष्याचा पायाही रचला जाईल.जुने पॅटर्न्स सोडा. तुमच्या क्रिएटिव्ह प्रयत्नांना यश मिळेल किंवा आत्म-अभिव्यक्तीसाठी नवीन संधी चालून येतील. स्वतःची सकारात्मक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न कराल, तसंच सेल्फ केअरला प्राधान्य द्याल. आपल्या जीवनात नेमकं काय हवं आहे याचा शोध अजूनही घेत आहात.योग्य दिशा मिळण्यास अडचण येईल.
मीन -नात्यांमध्ये वृद्धी आणि बदलाचा काळ आहे. जुने पॅटर्न, सवयी सोडून इतरांशी नातेसंबंध प्रस्थापित करण्याच्या नवीन पद्धती तुम्ही अवलंबत आहात, ज्या अधिक ऑथेंटिक आणि परिपूर्ण आहेत. करिअरमध्ये वृद्धी आणि प्रगती दिसत आहे.
लवकरच मोठं परिवर्तन घडून येणार आहे असं दिसतंय. तुमच्यात मोठ्या गोष्टी साध्य करण्याची क्षमता आहे. तुम्हाला आरोग्यासंबंधी भीती किंवा अनिश्चितता वाटत असेल; मात्र दैवी योजनेवर विश्वास ठेवा, तुम्हाला उपचार आणि शांती दोन्ही मिळेल. एखाद्या स्वरूपाचा प्रवास हा मुक्ती आणि परिवर्तनाचा मार्ग ठरू शकतो. यामुळे जुने पॅटर्न सोडून, नवीन अनुभव घेण्याची संधी मिळेल.
Leave a Reply