News & View

ताज्या घडामोडी

सरला मुळे सभापती तर श्याम पडुळे उपसभापती !

बीड- बीड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी सरला मुळे यांची तर उपसभापती पदावर श्यामराव पडुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती पद आ क्षीरसागर यांच्याकडे तर उपसभापती पद उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्याकडे गेले आहे.

बीड बाजार समितीच्या निवडणुकीत आ संदिप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांच्या पॅनल चा धुव्वा उडवत 15 जागा ताब्यात घेतल्या होत्या.संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते.18 पैकी 15 जागा आ क्षीरसागर यांच्या ताब्यात गेल्याने सभापती त्यांच्याच गटाचा होणार हे निश्चित होते.

शुक्रवारी सभापती पदासाठी सरला मुळे यांचा तर उपसभापती पदासाठी श्यामराव पडुळे यांचा एकमेव अर्ज आला.त्यामुळे या दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आ क्षीरसागर यांनी आता सहकार क्षेत्रात देखील आपलं नेतृत्व सिद्ध केलं आहे.गेल्या तीस चाळीस वर्षांपासून ही बाजार समिती माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात होती.यावेळी मात्र त्यांना केवळ व्यापारी आणि हमाल मापाडी मतदारसंघात तीन जागांवर विजय मिळवता आला.उर्वरित 15 जागा आ क्षीरसागर यांच्या ताब्यात गेल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *