मेष –
आपली रास कायमच कामासाठी आतुर असते. उतावेळपणा हा आपला गुण आहे. याच गोष्टी धरून आज बरीच कामे कराल. पैशाशी निगडित व्यवहार आज मार्गी लागतील.
वृषभ –
आपल्या राशीला योगकारक असणारा शनी ग्रह आहे. म्हणूनच आजची शनेश्वर जयंती आपल्याला विशेष लाभदायक ठरणार आहे. शनी उपासना करावी. मन सकारात्मक ठेवा आणि पुढे चला.
मिथुन-
विनाकारण त्रास, कटकटी मागे लावून घेऊ नका. आपल्या राशीला निष्फळ बोलण्याची किंवा बडबड करण्याची सवय आहे. ती आज टाळा. काही गैर अर्थ निघून आपल्याविषयी अफवा उठतील.
कर्क –
“केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे” लोकांशी कनेक्ट राहा. त्यातून तुम्हाला फायदा होईल. विविध प्रकारच्या लाभांचा आजचा दिवस आहे, त्याचा लाभ घ्या.
सिंह-
कामाच्या ठिकाणी रास सिंह असली तरी आज वाघ होऊन काम कराल. एकत्रितरित्या भरपूर कामे आल्यामुळे ताणतणाव वाढेल. पण नेटाने सामोरे जा. यश,सन्मान, कीर्ती पदरात पडेल.
कन्या –
“देवाधर्मी पुण्य आहे सांगे सखा श्रीहरी” आजचा असा दिवस आहे. द्विधा मनस्थिती टाळा. योग्य ते निर्णय घ्या आणि देवाचे नाव मुखामध्ये राहू दे.
तूळ –
पैशाचे विचार हे कायमच आपल्याला येत असतात. वैश्य प्रवृत्तीची रास आहे. आज अचानक पैसा मोठ्या प्रमाणात मिळण्याचे योग आहेत. पण लक्षात ठेवा हा पैसा वाम मार्गातून आलेला नको. मनस्थिती आणि परिस्थिती दोन्ही नीट हाताळा.
- आजचे राशीभविष्य!
- पाटील मॅडम 10 हजार, सावंत सर 15 हजार,स्वामी सर 20 हजार!कुप्पा शाळेने चिकटवले विद्यार्थी खरेदी रेटकार्ड!
- आजचे राशीभविष्य!
- खोटे अप्रूव्हल, बोगस शालार्थ आयडी :परळीच्या पाच मास्तरांना घरचा रस्ता!
- संचमान्यतेसाठी बोगस विद्यार्थी :बोरगाव च्या शाळेचा प्रताप!
वृश्चिक–
परदेश प्रवासाचे बेत आखत असाल तर आज त्याला यश मिळेल. जोडीदाराबरोबर चांगले संबंध राहतील. आज अबोला न धरता बोलून कामे होण्याचा दिवस आहे.
धनु –
शनी महाराजांची विशेष उपासना करा. तब्येतीच्या तक्रारी टाळता येतील. शनी मंदिरात जाऊन दर्शन घ्या आणि शनी जप करा. गुप्त शत्रूंवर मात कराल.
मकर –
खरंतर तशी रसिक असणारी आपली रास पण आज थोडी रस्तिकता वाटेल. प्रेमप्रणयाच्या गोष्टीमध्ये यश मिळेल, रस वाटेल. शांत न राहता आनंदी राहा दिवस चांगला राहील.
कुंभ –
मनस्थिती चांगली राहील. कामे मार्गी लागतील. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. विशेषत्वाने शिव उपासना करा दिवस चांगलाच आहे.
मीन-
साधी भोळी आपली रास काही गोष्टींना न लपवता इतर पारदर्शकता ठेवून नाती जपता. म्हणूनच आज या नात्यातील गोडवा भावंडांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल. बहिणीचे विशेष प्रेम लाभेल. पत्रव्यवहार मार्गी लागतील. जवळचे प्रवास घडतील.



Leave a Reply