News & View

ताज्या घडामोडी

निळ्या वादळात आदर्श सोबत संदीपचा जल्लोष !

बीड – दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही बीडची भीमजयंती आ. संदीप क्षीरसागर यांच्या नियोजनात सुपरहिट ठरली. आदर्श शिंदेंच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाला शहरातील स्टेडियम अक्षरशः तुडुंब भरले होते. यावेळी बीड शहरासह तालुक्यातून तसेच जिल्ह्यातूनही या कार्यक्रमास लोक उपस्थित होते.


आदर्श शिंदेंच्या भीमगीतांनी बीडकरांना मंत्रमुग्ध केले.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मंगळवार (दि.२३) रोजी बीडमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी महाराष्ट्रातील तसेच देशभरात सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या भीमगीतांचा लाईव्ह-शो आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रचंड उत्साहासह जिल्हाभरातून लोक आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या तीन उद्धारकर्त्यांच्या जयंत्या आम्ही सण म्हणून साजऱ्या करतो. बाबासाहेबांच्या संविधानामुळे आणि मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे मी आमदार आहे. आज तुमच्यामुळे मी आमदार जरी असलो तरी तुमच्यातलाच मी एक भीमसैनिक आहे. सध्याच्या परिस्थितीत एका विशिष्ट शक्तीकडून संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे. परंतु मी एक भीमसैनिक म्हणून संविधान वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहील.

दरम्यान आदर्श शिंदे यांनी आ.संदीप क्षीरसागर यांचा उल्लेख संविधान रक्षक असा केला. तसेच आदर्श यांनी सध्यस्थितीवर नवीनच रचलेल्या ”गेला तर जाऊद्या आपला प्राण, पण वाचवा संविधान.” हे गाण गायलं आणि हे सर्वात जास्त लक्षवेधी आणि कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. हे गाणे ऐनवेळी दिवसभरातच रचून सादर केल्याचे आदर्श शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *