News & View

ताज्या घडामोडी

बहिणीच्या स्वागताला भावाची लगबग !

परळी- लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीच्या उमेदवार तथा माजीमंत्री पंकजा मुंडे या आपल्या बहिणीच्या अभूतपूर्व स्वागतासाठी भाऊ धनंजय मुंडे यांची लगबग दिसून आली.एक हजार किलोचा हार,चार राज्यातील स्वागत पथकं आणि जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण,हा नजारा होता परळी शहरात.पंकजा मुंडे या प्रथमच परळीत येत असल्याने धनंजय मुंडे यांच्या वतीने त्यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेच्या उमेदवारीचे तिकीट मिळाल्यानंतर बीड जिल्ह्यात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मात्र, चर्चा झाली ती परळी येथील गोपीनाथ गडावर धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या शाही स्वागताची. राज्यातील सत्ता समीकरण बदलल्यानंतर तीन पक्ष एकत्रित आले आणि मुंडे बहीण भावातील संघर्षालाही पूर्णविराम मिळाला. दिवाळीतील भाऊबीज एकत्र साजरी केली. तेव्हापासून संघर्षाचे गोडव्यात रुपांतर झालं. आज बहीण परळीत येणार असल्याने धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावर हजार किलोचा फुलांचा हार फटाक्यांचे बार, 50 जेसीबी मधून फुलांची उधळण, कर्नाटक तमिळनाडू मणिपूर येथील बँड पथक असं अभूतपूर्व स्वागत केलं. तसेच पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी बहिण भावांनी एकत्रित लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना आज गोपीनाथ गडावर भाऊ आलाय. खासदार आणि पालकमंत्री माझ्या स्वागतासाठी आले, किती हेवी उमेदवार आहे मी. सगळ्यांना मी मदत मागितली अन् आपल्या घराला गृहीत धरलं तर हे बरोबर दिसणार नाही. म्हणून मी घरी जाणार होते. पण भाऊच इथे आला तरीही मी घरी जाणार आहे. काकूंचा आशीर्वाद आणि पंडीत अण्णाचे दर्शन घेणार आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

न्यूज अँड व्युज या चॅनेल ला सबस्क्राईब करा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *