News & View

ताज्या घडामोडी

लाचखोर उपजिल्हाधिकारी ताब्यात !

बीड- तलावात गेलेल्या जमिनीचा मावेजा मिळावा यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागून पाच हजार रुपये घेताना बीडच्या उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.निवृत्त मंडळ अधिकारी सरवदे यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. सलग दुसऱ्या दिवशी महसूल विभागाच्या लाचखोरांवर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

बीड तालुक्यातील सात्रापोत्रा येथील तलावाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या घराचा पाच लाख रुपयांचा मावेजा कार्यालयात जमा झाला होता.हा मावेजा मिळावा यासाठी तक्रारदार अनेकवेळा उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांना भेटला.प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणे सांगून मावेजा देण्यात टाळाटाळ करण्यात आली.

दरम्यान याच कार्यालयात काम करणारा खाजगी इसम नवनाथ सरवदे जो सेवानिवृत्त मंडळ अधिकारी आहे त्याची भेट घेण्यास उपजिल्हाधिकारी यांनी सांगितले. सरवदे यांनी मावेजा हवा असल्यास दहा हजार रुपयांची मागणी केली.याबाबत उपजिल्हाधिकारी सागरे यांना विचारणा केली असता सरवदे सांगतात ते योग्य आहे असे समर्थन त्यांनी दिले.

या सगळ्या प्रकरणात तक्रारदार याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे व सहकाऱ्यांनी सापळा लावला.सरवदे आणि सागरे या दोघांना पाच हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *