बीड- नगर परिषदेच्या प्रशासक असलेल्या नीता अंधारे यांनी प्रशासकीय कामकाजात मनमानी कारभार सुरू केल्याने दिवसा अंधार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नगर परिषद बीडमध्ये अत्यंत वादग्रस्त असलेल्या गणेश पगारे यांच्याकडील पदभार काढण्याचे नाटक करत पुन्हा त्याच पगारे कडे लेखापाल पदाचा पदभार दिल्याने अंधारे यांच्या भूमिकेबद्दल शंका घेतली जात आहे.
बीड नगर परिषद मध्ये अनेक प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप असलेले आणि पोलीस तक्रार तसेच विभागीय चौकशी झालेले गणेश पगारे याच्यावर अंधारे मॅडम यांनी जास्तीच मेहरबानी दाखवली आहे.
हमीद चाऊस यांच्या प्रकरणात पगारे यांची चौकशी सुरू आहे.नुकतीच जिल्हाधिकारी यांनी देखील पुनश्च अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
- रस्त्याची कामे करताना मार्कआउट बदलण्याचे प्रकार!
- आजचे राशीभविष्य!
- घरकुल च्या नावाखाली शंभर कोटींचा वाळू उपसा!एस आय टी चौकशीची आ पंडित यांची मागणी!
- आजचे राशीभविष्य!
- अंबडचा लाचखोर तहसीलदार चव्हाण एसीबी च्या जाळ्यात!
असे असतानाही मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी मात्र पात्रता नसलेल्या पगारे यांच्याकडे लेखापाल पदाचा पदभार दिला आहे.विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच काही माजी नगरसेवक यांच्या तक्रारीवरून पगारे यांच्याकडील सर्व कामकाजचा पदभार काढून घेतला होता.मात्र अवघ्या पंधरा वीस दिवसात पगारे यांच्याकडे पुन्हा लेखापाल म्हणून पदभार सोपवला आहे.





Leave a Reply