News & View

ताज्या घडामोडी

बी एन्ड सी ने पैसे खाण्यासाठी उभारले गांडूळ खत शेड !

बीड- अधिकाऱ्यांना चार पैसे खायला मिळणार असतील तर ते काय करतील याचा नेम नाही.बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागात देखील असाच प्रकार उघडकीस आला आहे. बीड एन्ड सी च्या अधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या आवारात चक्क गांडूळ खत निर्मिती प्रकल्पासाठी शेड उभारले,यावर लाखो रुपये खर्च केले मात्र प्रत्यक्षात प्रकल्प सुरूच झाला नाही.

बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागात नेहमी काही ना काही कुटाणे सुरू असतात अधिकारी कितीही कार्यक्षम आणि प्रामाणिक असला तरी ठराविक गुत्तेदार अन उपअभियंता, सह अभियंता यांच्या टोळ्या त्याला व्यवस्थित काम करू देत नाहीत.

बीडच्या बी एन्ड सी कार्यालयात दोन तीन वर्षांपूर्वी गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी शेड तयार करण्यात आले. तत्कालीन प्रभारी उपअभियंता शिंदे यांनी हे शेड उभारण्यासाठी कार्यकारी अभियंता यांना पटवले. त्यांनीही कोणताच विचार न करता शेड उभारणीसाठी टेंडर प्रक्रिया पार पाडली.

तीन वर्षेपासून या ठिकाणी शेड उभा आहे मात्र प्रकल्प काही सुरूच झाला नाही.मुळात प्रश्न हा आहे की,गांडूळ खत निर्मिती प्रकल्प हा शेतकऱ्याच्या शेतात,कृषी कार्यालयात ,नगर पालिका उद्यान या ठिकाणी किंवा कॉलनी अथवा गावात केला तर त्याचा उपयोग होतो.पण शासनाचे पैसे आहेत अन ते आपल्या खिशात घालणे हाच आपला हक्क आहे असा समज असलेल्या शिंदे सारख्या अधिकाऱ्यांची कमी नाहीये.

त्यामुळे बीडच्या या कार्यालयात तब्बल पंधरा ते वीस लाख रुपये खाण्यासाठी हे शेड उभारण्यात आले.याची चौकशी करण्याची मागणी केली जाते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *