News & View

ताज्या घडामोडी

मल्टिस्टेट च्या कुटाण्यांमुळे प्लॉटिंग ला अच्छे दिन !

बीड- लोकांनी मोठ्या विश्वासाने ठेवलेले पैसे आपले खाजगी उद्योग प्लॉटिंग जमिनी घेण्यासाठी तसेच कारखाने आणि उद्योगधंदे उभारण्यासाठी वापरायचे आणि मनी लॉन्ड्रींग करत संस्था बुडाल्या की फरार व्हायचे असा सगळा उद्योग बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या मल्टीस्टेट आणि पतसंस्था चालकांनी केला यामुळे हजारो कोटी रुपये ठेविधानांचे बुडाले मात्र आता ज्या पतसंस्था आणि मल्टीस्टेट सुरू आहेत त्यांच्यासमोरही ठेवी काढण्यासाठी मोठी गर्दी दिसत असून ठेवीदार आपला पैसा प्लॉटिंगमध्ये गुंतवत असल्याने प्लॉटिंगला अच्छे दिन आल्याचे चित्र दिसत आहे

बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात दहा पेक्षा अधिक पतसंस्था आणि मल्टीस्टेटला कुलूप लागले ज्ञानराधा असो परिवर्तन असो साईराम असो की मातोश्री अनेक पतसंस्था शेकडो कोटी रुपये गोळा करून बंद झाल्या यामागचा शोध घेतला असता एक लक्षात आले की ज्ञानराधा वाले कुठे असोत की जिजाऊ मासाहेब वाले शिंदे असो अथवा साईराम अर्बनचे परभणे या सगळ्यांनी ठेवीदारांच्या पैशाचा स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी सर्रास वापर केला.

सगळे नियम कायदे धाब्यावर बसवत या लोकांनी कोट्यावधी रुपयांच्या जमिनी खरेदी केल्या एवढेच नाही तर परभणे सारख्यांनी गुळ कारखाने स्टील उद्योग सुरू केले बबन शिंदे यांनी मेडिकल कॉलेज साठी आणि प्लॉटिंग साठी हा पैसा वापरला त्यामुळे अचानक मार्केटमध्ये मंदी आली आणि लोकांनी आपल्या ठेवी काढण्यासाठी एकच गर्दी केली त्यामुळे या पतसंस्था आणि मल्टीस्टेट ला कुलूप लागले आज घडीला बीड जिल्ह्यातील अडीच ते तीन हजार कोटी रुपये या पतसंस्थांमध्ये अडकून पडले आहेत आणखी देखील अनेक पतसंस्थांनी अशाच पद्धतीने मनी लॉन्ड्री चे धंदे केल्यामुळे लोकांनी आता आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र आहे

गेवराईत इन्कम टॅक्स ची धाड अन बीडच्या मल्टिस्टेट मालकाच्या छातीत धडधड ! लवकरच पर्दाफाश होणार !!

गेल्या आठवडाभरात बीड माजलगाव गेवराई अंबाजोगाई परळी आष्टी पाटोदा या भागातील अनेक पतसंस्था आणि मल्टीस्टेट मधून जवळपास 400 ते 500 कोटी रुपये ठेवीदारांनी काढून घेतले आहेत एवढा पैसा घरी किंवा राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्यापेक्षा लोकांनी हा पैसा प्लॉटिंग मध्ये गुंतवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा बीडच्या प्लॉटिंग वाल्यांना सोन्याचे दिवस आल्याचे चित्र आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *