बीड- छत्रपती संभाजी नगर असो की बीड अथवा परभणी या ठिकाणच्या पतसंस्था अचानक बुडाल्याने ठेवीदार हैराण झाले आहेत.अशातच शहरातील अनेक मल्टिस्टेट मध्ये वेगवेगळ्या गड आणि देवस्थानचे कोट्यवधी रुपये अडकल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.आता हे पैसे परत मिळवायचे कसे असा प्रश्न येथील महाराज आणि ट्रस्टी समोर निर्माण झाला आहे.
आदर्श पतसंस्था असो की जिजाऊ मा साहेब पतसंस्था या अचानक बंद झाल्याने हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले.अनेकांच्या वैद्यकीय आणि शैक्षणिक अडचणी त्यामुळे वाढल्या आहेत.जिजाऊ पतसंस्था बंद झाल्याने तर शेकडो ठेवीदार हवालदिल झाले आहेत.
दरम्यान जिजाऊ आणि आदर्श पतसंस्था मध्ये झालेल्या गडबडीचा फटका ज्ञानराधा मल्टिस्टेट ला बसला. एक अफवा आली अन ज्ञानराधा मधील शेकडो कोटी रुपयांच्या ठेवी ग्राहकांनी काढून घेतल्या.स्वतः सुरेश कुटे यांनी आवाहन केल्यानंतर देखील लोकांची गर्दी कमी झाली नाही.
- आजचे राशीभविष्य!
- एक अकेला शेर, बाकी सब ढेर!संदीप क्षीरसागर पुन्हा विजयी!
- शहरात 98 हजार तर ग्रामीण मध्ये एक लाख चाळीस हजार मतदान!
- पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!
- आजचे राशीभविष्य!
त्यातच बीड तालुक्यातील आणि जिल्ह्यातील अनेक गड आणि देवस्थानचे कोट्यवधी रुपये बीड मधील अनेक मल्टिस्टेट मध्ये ठेवण्यात आले आहेत.हे पैसे सुरक्षित आहेत की नाही हे ठेवणारे आणि ठेवून घेणारे यांनाच माहीत.पण बीड जिल्ह्यातील गडाचे महाराज आणि देवस्थानचे ट्रस्टी आपल्या हक्काच्या ठेवी परत मिळवण्यासाठी या मल्टिस्टेट च्या मालकाकांडे चकरा मारत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Leave a Reply