अमळनेर- बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील कोतन या गावातील एका व्यक्तीने गुप्तधन आणि जमिनीतील पुरून ठेवलेले सोने बाहेर काढण्यासाठी मुलीचा कुमारिका बळी देण्याचा प्रयत्न केला.या प्रकाराने गावात खळबळ उडाली असून गावकरी सहा तासापासून अमळनेर ठाण्यात बसून आहेत.मात्र फिर्याद घ्यायला सक्षम अधिकारी नसल्याने गावकरी संतप्त झाले आहेत.
पाटोदा तालुक्यातील कोतन या गावातील दादाराव रघुनाथ घोशिर या व्यक्तिणे गावात अंधश्रद्धा पसरवली आहे.गावातील भाऊसाहेब गरवकर यांच्या घरी जाऊन त्यांना आमिष दाखवत त्यांची मुलगी पूजा हिला बळी देण्यासाठी घेऊन जाणार असल्याचे सांगितले.
पुण्यातील एका जागेवर गुप्तधन आहे ते बाहेर काढण्यासाठी कुमारिकेचा बळी द्यायचा असल्याने घोशिर यांनी गरवकर यांच्या मुलीची मागणी केली.हा सगळा प्रकार गरवकर यांनी ग्रामस्थांना सांगितला.सगळ्यांनी मिळून घोशिर यांना जाब विचारला तेव्हा मी बळी देणार आहे ,तुम्हाला काय करायचे ते करा अशी धमकी दिली.
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- देशात एस्मा कायदा लागू, जीवनावश्यक वस्तूची साठवणूक पडणार महागात!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
या सगळ्या प्रकारानंतर ग्रामस्थांनी मंगळवारी म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी थेट अमळनेर पोलीस ठाणे गाठले.त्या ठिकाणचे सगळे अधिकारी बंदोबस्तावर असल्याने गेल्या सहा सात तासापासून हे ग्रामस्थ ठाण्यात बसून आहेत.












Leave a Reply