बीड- राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये,वैद्यकीय महाविद्यालय आणि औषध भांडार येथे रुग्णसेवेसाठी लागणारी औषधे स्थानिक पातळीवर खरेदी करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे.यामुळे आता सत्ताधारी मंडळींच्या कार्यकर्त्यांना आणि गुत्तेदारांना खाण्यासाठी कुरण उपलब्ध होणार आहे.
नांदेड येथील स्व शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे राज्यभरात खळबळ उडाली. हे मृत्यू औषधांचा तुटवडा असल्याने झाल्याचे निदर्शनास आले.
सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात यावरून मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले.गेल्या अनेक दिवसांपासून औषध खरेदी ही हाफकीन या संस्थेमार्फत केली जात होती.मात्र आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ती बंद करत औषध खरेदीसाठी समिती नेमली.
परंतु या समितीकडून देखील याबाबत काहीच कारवाई झाली नाही.त्यानंतर नांदेड ची घटना घडल्याने आता शासनाने स्थानिक पातळीवर खरेदी करण्यासाठी मान्यता दिली आहे.जिल्हा वार्षिक नियोजन समितीमधून 100 टक्के खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
- आजचे राशीभविष्य!
- एक अकेला शेर, बाकी सब ढेर!संदीप क्षीरसागर पुन्हा विजयी!
- शहरात 98 हजार तर ग्रामीण मध्ये एक लाख चाळीस हजार मतदान!
- पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!
- आजचे राशीभविष्य!
गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली लोकल पर्चेस पुन्हा सुरू होणार असल्याने सत्ताधारी मंडळींचे जवळचे कार्यकर्ते आणि गुत्तेदार मंडळींसाठी हे नवे कुरण उपलब्ध होणार असल्याची चर्चा आहे.
Leave a Reply