News & View

ताज्या घडामोडी

मागील परसेंटेज साठी ठाकर अजूनही बीडमध्येच ठाण मांडून !

सीएस नागेश चव्हाण म्हणजे मला पहा अन फुले वहा !!

बीड-कोरोनाच्या काळात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या तानाजी ठाकर याची महिनाभरापूर्वी बीडवरून बदली झाली.मात्र अजूनही तो बीडमध्येच कारभार पाहतो आहे.तसेच रियाज शेख चा भाऊ नाविद हा गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत पणे स्टोर चा कारभार पाहत आहे.प्रभारी सीएस डॉ नागेश चव्हाण हे जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहेत.त्यांचा कारभार म्हणजे मला पहा अन फुल वहा असा झाला आहे.

बीड जिल्हा रुग्णालयात झालेल्या गैरप्रकार ची चर्चा थेट विधानभवनात झाली.त्यानंतर येथील वादग्रस्त स्टोर किपर तानाजी ठाकर,रियाज शेख आणि एजाज यांची बीड मधून महिनाभरापूर्वी बदली झाली.

रियाज आणि एजाज यांनी दोन दिवसात चार्ज सोडला, मात्र कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा मास्टर माईंड असलेल्या ठाकर ने आठ दहा दिवस दवाखान्यात ऍडमिट होण्यात घालवले.त्यानंतर एक दिवस बदलीच्या ठिकाणी रुजू होऊन पुन्हा जिल्हा रुग्णालयात येऊन बसला आहे.

गेल्या दोन अडीच वर्षात जेवढे व्यवहार झाले त्याचा हिशोब तसेच काही लोकांकडून परसेंटेज येणे बाकी असल्याने ठाकर बीडमध्येच तळ ठोकून आहे.प्रभारी सीएस असलेले डॉ नागेश चव्हाण यांचे देखील ठाकर च्या कारभाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.

रियाज याचा भाऊ नाविद हा सध्या स्टोर च काम पाहतो आहे,तो सरकारी नोकरीत नाही,किंवा कंत्राटी नोकरीत देखील नाहीये मात्र तरीदेखील तो अनधिकृत पणे स्टोर मधील काम करतो आहे.याकडे देखील सीएस डॉ चव्हाण यांचे दुर्लक्ष होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *