बीड- तब्बल दोन वर्षापेक्षा अधिक काळापासून लोखंडी सावरगाव येथे रुजू न होता घरी बसलेले बीडचे माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सूर्यकांत गीते यांची नेकनूर चे वैद्यकीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात विभागीय चौकशी सुरू असलेल्या मध्ये या डॉक्टर गीते यांचा समावेश आहे हे विशेष
बीड जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन चलनेचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांची कोरोनाच्या काळात नाशिकला बदली झाल्यानंतर डॉक्टर सूर्यकांत गीते हे बीडला रुजू झाले होते मात्र अवघ्या काही महिन्यातच डॉक्टर सुरेश साबळे यांच्याकडे जिल्हा रुग्णालयाचा कारभार आला आणि डॉक्टर गीते यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले त्यानंतर त्यांची नियुक्ती लोखंडी सावरगाव येथे वैद्यकीय अधीक्षक या पदावर करण्यात आली जून 2021 पासून डॉक्टर गीते हे नोकरीवर रुजू न होता घरीच होते
दरम्यान दोन वर्षापासून घरी असलेल्या डॉक्टर सूर्यकांत गीते यांच्या बदलीची ऑर्डर प्राप्त झाली असून नेकनूर स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून स्थापना देण्यात आली आहे डॉक्टर गीते यांची कोरोना काळात झालेल्या औषध खरेदी विक्री प्रकरणात विभागीय चौकशी सुरू असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील प्रस्तावित करण्यात आलेली आहे अशा डॉक्टर गीते यांची लेखनूरला नियुक्ती झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे
Leave a Reply