बीड- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बीडमधील काका पुतण्यात देखील बंडखोरी झाली.जयदत्त क्षीरसागर यांना सोडून डॉ योगेश क्षीरसागर हे अजित पवार गटात सहभागी झाले.त्यानंतर येत्या रविवारी 27 ऑगस्ट रोजी अजित पवार यांची बीडला सभा होत आहे.तर दुसरीकडे इट येथील सूतगिरणी वर माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांची सभा होत आहे.
शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये जुलै महिन्यात फूट पडली.बीडचे आ संदिप क्षीरसागर वगळता जिल्ह्यातील इतर तिन्ही आमदार अजित पवार गटात गेले.संदिप यांनी 17 ऑगस्ट रोजी बीडला मोठी सभा घेतली.
या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार यांची 27 ऑगस्ट रोजी सभा होत आहे.छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम येथे दुपारी 3 वाजता ही सभा होत आहे.या सभेपुर्वी बीडचे माजी नगरसेवक डॉ योगेश क्षीरसागर हे आपल्या सहकाऱ्यांसह अजित पवार गटात सहभागी झाले.त्यानंतर माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
- आजचे राशीभविष्य!
- एक अकेला शेर, बाकी सब ढेर!संदीप क्षीरसागर पुन्हा विजयी!
- शहरात 98 हजार तर ग्रामीण मध्ये एक लाख चाळीस हजार मतदान!
- पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!
- आजचे राशीभविष्य!
दरम्यान आता 27 ऑगस्ट रोजी जयदत्त क्षीरसागर यांनी एकनिष्ठ कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची सभा आयोजित केली आहे. अजित पवार बीडमध्ये सभा घेत असताना क्षीरसागर यांनी देखील त्याच दिवशी सभा ठेवल्याने भविष्यात बीडचे राजकारण तापणार अशी चिन्हे आहेत.
Leave a Reply