बीड- बीड जिल्ह्याच्या राजकारणातील दिग्गज घराणे असलेल्या क्षीरसागर परिवारातील डॉ भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव डॉ योगेश क्षीरसागर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश नक्की झाला आहे.येत्या दोन चार दिवसात ते मुंबईत अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश घेणार आहेत.विशेष म्हणजे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याशिवाय हा प्रवेश सोहळा होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर बीडचे आ संदिप क्षीरसागर यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर हे कोणत्या पक्षात किंवा गटात जाणार याची चर्चा सुरू झाली होती.
गेल्या महिना दिड महिन्यापासून जयदत्त क्षीरसागर यांनी ठोस भूमिका घेतलेली नाही.त्यामुळे त्यांचे पुतणे डॉ योगेश क्षीरसागर यांनी अखेर अजित दादांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.23 किंवा 24 ऑगस्ट रोजी मुंबई येथे त्यांचा प्रवेश सोहळा होईल.
डॉ योगेश क्षीरसागर हे माजी नगरसेवक असून माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण आणि दिपाताई क्षीरसागर यांचे चिरंजीव आहेत.गेल्या पाच सात वर्षांपासून डॉ योगेश हे जयदत्त क्षीरसागर यांच्या खांद्याला खांदा लावून राजकारणात सक्रिय आहेत.
डॉ क्षीरसागर यांच्यासोबत त्यांच्या पत्नी डॉ सारिका या देखील राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहेत.सार्वजनिक कार्यक्रम,जयंती,उत्सव,सभा,समारंभ या माध्यमातून लोकांशी कनेक्ट वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर डॉ योगेश यांनी आपले काका जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे अजित पवार यांच्यासोबत जाण्यासाठी आग्रह धरला होता.मात्र त्यांचा निर्णय होत नसल्याने अखेर डॉ योगेश अखेर 23 किंवा 24 रोजी मुंबईत अजित पवार गटात प्रवेश घेणार आहेत.
Leave a Reply